मुंबई : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा पुढील तपास पूर्ण झाल्याच्या अहवालाला अंतिम मंजुरी द्यायची की नाही याचा निर्णय सीबीआयने अद्याप घेतलेला नाही. हा निर्णय घेण्यासाठी वेळ देण्याची विनंती सीबीआयने सोमवारी उच्च न्यायालयात केली.  न्यायालयाने सीबीआयची विनंती मान्य करून तपास पूर्ण झाल्याच्या अहवालाबाबत निर्णय घेण्यासाठी  आणखी चार आठवडय़ांची मुदतवाढ दिली.

पुढील तपास पूर्ण झाल्याचा अहवाल अंतिम मंजुरीसाठी मुख्यालयाकडे पाठवण्यात आल्याची माहिती सीबीआयने मागील सुनावणीवेळी न्यायालयाला दिली होती. याप्रकरणी खटला सुरू असतानाही प्रकरणावर उच्च न्यायालयाची देखरेख आवश्यक असल्याच्या मागणीचा निर्णय न्यायालयावर सोपवत असल्याचेही सीबीआयतर्फे त्यावेळी स्पष्ट करण्यात आले होते. तपास अधिकाऱ्याने सादर केलेला अहवाल सीबीआय मुख्यालय मान्य करते की नाही याबाबतचा अंतिम निर्णय आल्यानंतर प्रकरणाची सुनावणी घेण्यात येईल, असे सीबीआयच्या माहितीनंतर नमूद केले होते. 

Narayan Rane case, Vinayak Raut, Parab,
२००५ नारायण राणेंच्या सभेतील गोंधळाचे प्रकरण : विनायक राऊत, परब, सावंत, देसाई, रवींद्र वायकर यांची निर्दोष सुटका
Abhishek Ghosalkar murder case
अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणाचा तपास सीबीआय किंवा एसआयटीकडे द्या, तेजस्वी घोसाळकरांची उच्च न्यायालयात मागणी
hotel owner attempts suicide in front of police station
हॉटेल व्यावसायिकाचा पोलीस ठाण्यासमोर आत्महत्येचा प्रयत्न; काय आहे प्रकार?
cabinet minister nitin gadkari news
पुढील पंतप्रधान तुम्ही होणार का? नितीन गडकरींनी स्पष्टच सांगितलं…

न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणी सोमवारी सुनावणी झाली. त्यावेळी तपास पूर्ण झाल्याच्या अहवालावर अंतिम निर्णय घेण्यासाठी वेळ देण्याची विनंती सीबीआयने न्यायालयाकडे केली. त्यावर निर्णय घेण्यासाठी किती वेळ लागेल ? अशी विचारणा न्यायालयाने सीबीआयचे वकील संदेश पाटील यांच्याकडे केली. त्यावर न्यायालयाने योग्य ती मुदतवाढ द्यावी असे पाटील यांनी सांगितले. न्यायालयाने सीबीआयची विनंती मान्य करत असल्याचे स्पष्ट केल्यावर प्रकरणातील आरोपी शरद कळसकर आणि विक्रम भावे यांच्यावतीने मुदतवाढ देण्यास विरोध करण्यात आला. तसेच प्रकरणावर न्यायालयाच्या देखरेखीची आवश्यकता नसल्याचा दावा केला. न्यायालयाने मात्र  सीबीआयची विनंती मान्य करून तपास पूर्ण झाल्याच्या अहवालावर निर्णय घेण्यासाठी चार आठवडय़ांची मुदतवाढ दिली.