दादरची ओळख असणाऱ्या शिवाजी पार्क मैदानाचं नाव बदलण्यात आलं आहे. शिवाजी पार्क मैदानाचं नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराज पार्क असं करण्यात आलं आहे. नामविस्ताराचा प्रस्ताव बुधवारी महापालिका सभेत मंजूर करण्यात आला. यानिमित्ताने तब्बल ७३ वर्षांनी शिवाजी पार्क मैदानाचं नाव बदलण्यात आलं. ऐतिहासिक महत्त्व असणाऱ्या शिवाजी पार्क मैदानात अनेक राजकीय सभा पार पडल्या असून अनेक क्रिकेटपटूही या मैदानावर घडले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मूळ माहीम पार्क अशी ओळख असणाऱ्या या उद्यानाचं १० मे १९२७ रोजी शिवाजी पार्क असं नामकरण करण्यात आलं होतं. मैदानावर शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. लोकवर्गणीतून हा पुतळा १९६६ रोजी उभारण्यात आला होता. स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी बुधवारी महासभेत या मैदानाचा नामविस्तार करण्याचा ठराव मांडला. सर्वपक्षीयांनी या प्रस्तावाला पाठिंबा दिल्यानंतर महापौर किशोरी पेडणेकर यांनी ठरावाला मंजुरी दिली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dadar shivaji park ground renamed as chhatrapati shivaji maharaj park sgy
First published on: 12-03-2020 at 15:53 IST