दहीहंडी उत्सवासंदर्भात न्यायालयाने दिलेल्या विविध निर्देशांचे उल्लंघन केलेले नाही. उलट निर्देशांची काटेकोर अंमलबजावणी होईल असाच प्रयत्न केल्याचा दावा सरकारने, तर दहीहंडीबाबत राज्य सरकारला सूचना करणे एवढेच काम होते. सूचनांची अंमलबजावणी आपल्या हातात नाही, असा अजब दावा आदेशाचे उल्लंघन करण्यात आघाडीवर असल्याचा आरोप असलेले भाजपचे मुंबई अध्यक्ष आणि सरकारच्या दहीहंडी समितीचे अध्यक्ष आशीष शेलार यांनी उच्च न्यायालयात केला.
आदेशाचे कसे सर्रास उल्लंघन झाले आणि शेलार यांनीही त्याला कसे प्रोत्साहन दिले याबाबतची छायाचित्रे याचिकाकर्त्यां स्वाती पाटील यांचे वकील नितेश नेवशे यांनी मागील सुनावणीच्या वेळेस न्यायालयात केली होती. त्याची गंभीर दखल न्यायालयाने घेत शेलार आणि नियमभंग करणारांना सुनावले होते.
संग्रहित लेख, दिनांक 15th Apr 2016 रोजी प्रकाशित
‘दहीहंडी उत्सवात निर्देशांची काटेकोर अंमलबजावणी’
दहीहंडी उत्सवासंदर्भात न्यायालयाने दिलेल्या विविध निर्देशांचे उल्लंघन केलेले नाही.
Written by लोकसत्ता टीम
Updated:
First published on: 15-04-2016 at 00:11 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dahihandi festival