एका १७ वर्षीय मूकबधीर मुलीवर गेल्या चार महिन्यांपासून बलात्कार करणाऱ्या तरुणास गोवंडी पोलिसांनी अटक केली आहे. ही तरुणी गर्भवती राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. गोवंडी येथे राहणाऱ्या या मुकबधीर मुलीला परिसरात राहणाऱ्या रोशन गडसे (२१) या तरुणाने तिला एकदा वडापाव दिला आणि तिच्याशी ओळख वाढवली. नंतर तिला तो आपल्या घरी घेऊन गेला आणि तिच्यावर बलात्कार केला. गेल्या चार महिन्यांपासून हा प्रकार सुरू होता. सोमवारी तिच्या पोटात दुखू लागल्यामुळे तिच्या आईने तिला रुग्णालयात नेले तेव्हा ती दीड महिन्यांची गर्भवती असल्याचे उघड झाले. हे ऐकल्यावर तिच्या आईने पोलिसांत तक्रार केली.
संग्रहित लेख, दिनांक 6th Sep 2013 रोजी प्रकाशित
मूकबधीर मुलीवर बलात्कार
एका १७ वर्षीय मूकबधीर मुलीवर गेल्या चार महिन्यांपासून बलात्कार करणाऱ्या तरुणास गोवंडी पोलिसांनी अटक केली आहे.
First published on: 06-09-2013 at 01:33 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deaf mute girl raped