मुंबई : कापड व्यवसायात कार्यरत असलेल्या वरळीतील कंपनीच्या सव्‍‌र्हरमध्ये शिरकाव करून गोपनीय माहितीवर ताबा मिळवून त्या बदल्यात बिटकॉइनमध्ये खंडणी मागण्यात आली आहे. हॅकर्सनी कंपनीच्या लेखापालाला ई-मेल पाठवून खंडणीची मागणी केली आहे. या प्रकरणी ना.म. जोशी मार्ग पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सायबर पोलिसांच्या मदतीने या प्रकरणी तपास सुरू असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वरळी परिसरातील पांडुरंग बुधकर मार्गावरील सुमेर केंद्र येथील केिनगटन इंडस्ट्रीज प्रा. लि.मध्ये काम करणारे लेखापाल किशोर वामनपूर (४२) यांच्या तक्रारीवरून या प्रकरणी ना. म. जोशी मार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. करोनाकाळात कंपनीच्या सर्व कर्मचाऱ्यांना घरूनच काम करण्यास सांगण्यात आले आहे. त्यासाठी कंपनीचा डेटा सव्‍‌र्हरवर ठेवण्यात आला असून त्यामार्फत काम केले जाते. कंपनीतील कर्मचारी दारा मिस्त्री काम करत असताना डेटा इन्क्रिप्ट करण्यात आला असून त्यासाठी २४ तासांत पैसे भरण्यास सांगण्यात आले होते. हा संदेश त्यांनी पाहिल्यानंतर माहिती तंत्रज्ञान विभागात कार्यरत कर्मचाऱ्यांना त्याची माहिती दिली. त्यानंतर त्या विभागातील कर्मचाऱ्यांनी तज्ज्ञांच्या मदतीने तपासणी केली असता त्यांचे सव्‍‌र्हर हॅक करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. त्याबाबत तक्रारदार वामनपूर यांच्या ई-मेलवर आरोपींनी संदेश पाठवला होता. 

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Demand ransom in bitcoin in exchange for confidential details of the company zws
First published on: 25-01-2022 at 04:10 IST