राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (१४ एप्रिल) डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मुंबईत बोलताना भारतातील अस्पृश्यतेच्या प्रश्नावर भाष्य केलं आहे. “त्याकाळी आपल्याच समाजात काही लोक स्वतःला मोठं समजत होते आणि इतरांना माणुसकीची वागणूक देत नव्हते,” असं मत देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केलं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही डॉ. आंबेडकरांच्या कर्तृत्वाचं कौतुक केलं.

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, “समाजात समता स्थापित करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी आंदोलन केलं. आपल्याच समाजात काही लोक स्वतःला मोठं समजत होते आणि इतरांना माणुसकीची वागणूकही देत नव्हते. अशा काळात मानवतेचा संदेश घेऊन समतेचं राज्य आहे, येथे कुणीही जन्माने मोठं होणार नाही, कर्माने मोठं होण्याची प्रत्येकाला संधी मिळेल, असा संदेश डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिला.”

Prakash Ambedkar Slams PM Modi
पंतप्रधान मोदींच्या हुकूमशाही वृत्तीला कंटाळून १७ लाख कुटुंबांनी देश सोडला, ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या आरोपाने खळबळ
Narendra Modi and prakash ambedkar
“भारतीय मुसलमान घुसखोर…”, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वक्तव्यावर प्रकाश आंबेडकरांची टीका; काँग्रेसलाही केलं लक्ष्य!
In front of BJP candidate Navneet Rana Congress workers shouted slogans like Vare Panja Aya Panja
जेव्‍हा नवनीत राणांसमोर ‘वारे पंजा…’च्या घोषणा दिल्या जातात…
Narendra Modi death threat
“जगभरात मोदींच्या हत्येचा कट”, भाजपाच्या नेत्याचं खळबळजनक विधान; म्हणाले, “मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर…”

“आंबेडकरांनी दाखवलेल्या मार्गावर चालण्याची प्रतिज्ञा वारंवार घेतली पाहिजे”

“आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवलेल्या मार्गावर चालण्याची प्रतिज्ञा वारंवार घेतली पाहिजे. त्याच मार्गाने भारत देश जगातील सर्वोत्तम देश होऊ शकतो,” असं मत देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केलं.

व्हिडीओ पाहा :

हेही वाचा : विधवा महिलांना ‘गंगा भागिरथी’ म्हणण्यावरून राजकारणाचा पारा चढला, मंत्री लोढांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे तत्ववेत्ते होते, समाजसुधारक होते, अर्थशास्त्री होते, दुरद्रष्टे होते. त्यांनी १०० वर्षांपूर्वी ‘द प्रॉब्लेम ऑफ इंडियन रुपी’ हे पुस्तक लिहिलं. १०० वर्षांनी आज आपण या पुस्तकात डोकावून पाहतो, त्यावेळी लक्षात येतं की, ही व्यक्ती किती द्रष्टी होती.”

“काळा पैसा कसा जमा होईल?”

“आपल्या रुपयाची काय अडचण आहे, महागाई का होते, त्यावर काय उपाययोजना केल्या पाहिजेत, काळा पैसा कसा जमा होईल, त्या काळ्या पैशांपासून आपल्याला कसं बाहेर पडता येईल, या प्रत्येक गोष्टीचं विवेचन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १०० वर्षांपूर्वी करून ठेवलं आहे,” असंही देवेंद्र फडणवीसांनी नमूद केलं.