रेल्वे व महापालिकेने समन्वय साधून नालेसफाईकडे व्यवस्थितपणे लक्ष द्यावे. पावसाळ्यात पाणी साचून उपनगरी रेल्वे सेवा कोणत्याही परिस्थितीत बंद पडता कामा नये, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधितांना दिल्या. पावसाळ्यापूर्वी करावयाच्या कामांसंदर्भात आणि आपत्कालीन उपाययोजनांबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विविध यंत्रणांच्या प्रमुखांची बैठक गुरुवारी झाली. रेल्वे, नौदल, वायुसेना, महापालिका, एमएमआरडीए यासह अनेक यंत्रणांचे प्रमुख अधिकारी या बैठकीसाठी उपस्थित होते.