आधी बेस्ट बस नीट चालवून दाखवा मगा राज्याबाबत गप्पा मारा. तुम्ही गिरणी कामगाारांचं वाटोळं केलंत आता बेस्टच्या कर्मचाऱ्यांना देशोधडीला लावण्याचे पाप करु नका असा खोचक ट्विट धनंजय मुंडे यांनी केला आहे. गेल्या सात दिवसांपासून बेस्टचा संप सुरु आहे. मात्र बेस्ट कर्मचाऱ्यांच्या या संपावर अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून बेस्ट संपाचा फोटो ट्विट करत त्यांची भूमिका मांडली आहे. शिवसेनेने बेस्टचा संप पुकारल्यानंतर सुरुवातीला या संपाला पाठिंबा दिला होता. मात्र दोन दिवसातच त्यांनी संप मागे घेण्यास सांगितले. ज्यामुळे संतापलेल्या बेस्टमधील शिवसैनिकांनीही हा आदेश झुगारला आणि संपात सहभागी होणेच पसंत केले. तीन दिवसांपूर्वीच बेस्टचे शिष्टमंडळ मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीला गेले होते. अजूनही या संपावर कोणताही तोडगा निघालेला नाही. त्यामुळेच गेल्या सात दिवसांपासून मुंबईकरांचे हाल कायम आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवरच धनंजय मुंडे यांनी हा ट्विट केला आहे.

 

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dhananjay munde criticised uddhav thackeray on best strike issue
First published on: 14-01-2019 at 16:48 IST