दिवंगत अभिनेता राजेश खन्ना यांची जवळची मैत्रीण असलेल्या अनीता अडवाणी यांनी खन्ना यांची पत्नी डिम्पल कपाडिया मुलगी ट्विंकल आणि जावई अभिनेता अक्षयकुमार यांच्या विरोधात घरगुती हिंसाचारप्रकरणी महानगर दंडाधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवली आहे. ही तक्रार रद्द करण्यासाठी या तिघांनी उच्च न्यायालयात धाव घेतली असून न्यायालय गुरुवारी त्यावर निर्णय देणार आहे. दरम्यान, रिंकी खन्ना हिच्या विरोधातील तक्रार न्यायालयाने यापूर्वीच रद्द करत तिला दिलासा दिला आहे.
अडवाणी यांनी डिम्पल, अक्षयकुमार, ट्विंकल आणि रिंकी अशा चौघांविरुद्ध घरगुती हिंसाचारप्रकरणी महानगर दंडाधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवली होती.
संग्रहित लेख, दिनांक 9th Apr 2015 रोजी प्रकाशित
डिम्पल, ट्विंकलबाबत आज निर्णय
दिवंगत अभिनेता राजेश खन्ना यांची जवळची मैत्रीण असलेल्या अनीता अडवाणी यांनी खन्ना यांची पत्नी डिम्पल कपाडिया मुलगी ट्विंकल आणि जावई अभिनेता अक्षयकुमार यांच्या विरोधात घरगुती हिंसाचारप्रकरणी महानगर दंडाधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवली आहे.
First published on: 09-04-2015 at 03:00 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dimple twinkle rajesh khanna anita advani