‘शिवराज अष्टक’ या चित्रपट श्रृंखलेतून शिवरायांचा आणि त्यांच्या मावळ्यांनी गाजवलेल्या पराक्रमाच्या गाथा प्रेक्षकांसमोर आणण्यासाठी धडपडणारे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांचा ‘गुरुकुल’ पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांनी लांजेकर यांना हा पुरस्कार प्रदान केला.
आद्य संगीताचार्य बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांच्या घराण्याचा आशीर्वाद म्हणून ‘विश्वरूप कन्सेप्ट डेव्हलपर्स’ आणि ‘डेक्कन एज्युकेशन सोसायटी’च्या फिल्म आणि टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटतर्फे लांजेकर यांना ‘गुरुकुल’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. मावळातील कुसगाव येथील पीबीए फिल्मसिटीत लांजेकर यांच्या ‘सुभेदार’ या आगामी चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे. तिथेच हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. नरवीर तानाजी मालूसरे यांच्यावर आधारित चित्रपटात ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त एका महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘वयाच्या नव्वदीत असताना लांजेकर यांनी चित्रपटात दिलेली भूमिका मोठ्या आनंदाने साकारत आहे’, अशा शब्दांत राजदत्त यांनी आपला आनंद व्यक्त केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>>मुंबई : बनावट क्रमांकाचा वापर करून रिक्षा चालविणारे दोघे अटकेत

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Director digpal lanjekar honored with gurukul award mumbai print news amy
First published on: 27-12-2022 at 17:16 IST