लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या मध्यवर्ती खरेदी खात्यात प्रतिनियुक्तीवर असलेल्या तीन डॉक्टरांना अपुऱ्या मनुष्यबळामुळे पुन्हा रुग्णालयात बोलविण्यात आले आहे. मात्र त्यांची रुग्णालयात पाठवणी करण्यास मध्यवर्ती खरेदी खाते दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे रुग्णालयामध्ये रुग्णांना आरोग्य सुविधा पुरविणाऱ्या डॉक्टरांवर कामाचा ताण येत आहे. तसेच औषध खरेदीच्या कामासाठी औषध निर्माण शास्त्राचे ज्ञान असलेल्या व्यक्तीऐवजी डॉक्टरांचा वापर का करण्यात येत आहे, असा प्रश्न रुग्णालयाकडून उपस्थित करण्यात येत आहे.

Relief for Foreign Medical Graduates, Foreign Medical Graduates Internship Extended, foreign medical student Internship Extended to 2026, National Commission for Medical Sciences, medical students, foreign student medical internship,
परदेशी वैद्यकीय पदवीधरांना आंतरवासिता पूर्ण करण्यासाठी दोन वर्षांची मुदतवाढ; राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाकडून दिलासा
Kolhapur, Joint inspection,
कोल्हापूर : पंचगंगा नदी प्रदूषणाची उद्या संयुक्त पाहणी; याचिकाकर्ते पुन्हा उच्च न्यायालयात धाव घेणार
Medical, AIIMS, High Court,
‘मेडिकल’साठी दिलेले १.६० कोटी ‘एम्स’साठी वापरले, उच्च न्यायालय म्हणाले, आता परत द्या…
jet airways founder naresh goyal marathi news, naresh goyal marathi news
नरेश गोयल यांचा रुग्णालयातील मुक्काम वाढवा; पण जामीन मंजूर करू नका, ईडीची उच्च न्यायालयात मागणी, सोमवारी निकाल
security guards, Bhabha Hospital,
भाभा रुग्णालयात अतिरिक्त सुरक्षा रक्षक नेमण्यात येणार
officials and employees have breakfast by stopping polling mess at Yavatmals Hivari Polling Station
अरेच्चा! आधी पोटोबा, मग… मतदान थांबवून अधिकारी, कर्मचाऱ्यांची पंगत; यवतमाळच्या हिवरी मतदान केंद्रावर गोंधळ
न्यायालयीन प्रक्रियेच्या दुरुपयोगासाठी जनहित याचिका नको; याचिकाकर्त्यांना ५० हजार रुपयांचा दंड
Assistant Police Inspector promoted soon
आनंदाची बातमी! सहायक पोलीस निरीक्षकांना लवकरच पदोन्नती

करोनामध्ये वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी मुंबई महानगरपालिकेने अधिकारी, वैद्यकीय अधिकाऱ्यांना आवश्यकतेनुसार विविध विभागांमध्ये प्रतिनियुक्तीवर पाठवले होते. करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर हे अधिकारी आपल्या मूळ आस्थापनेत पुन्हा रुजू झाले. मात्र महानगरपालिकेच्या मध्यवर्ती खरेदी खात्यामध्ये प्रतिनियुक्ती असलेल्या तीन वैद्यकीय अधिकारी अद्याप तेथेच काम करीत आहेत. यामुळे त्यांच्या मुळ आस्थापनेत मनुष्यबळाचा तुटवडा निर्माण झाला आहे.

हेही वाचा… मुंबई :अमलीपदार्थांची तस्करी करणारी टोळी जेरबंद; एक कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त

परिणामी, या विभागातील अन्य अधिकाऱ्यांवर कामाचा ताण पडत आहे. ही बाब लक्षात घेऊन मुलुंडमधील म. तु. अगरवाल रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नोव्हेंबर २०२२ रोजी माध्यमिक आरोग्य सेवेचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी व खातेप्रमुख यांच्याकडे, तर वैद्यकीय महाविद्यालय असलेल्या कूपर रुग्णालय प्रशासनाने फेब्रुवारी २०२३ मध्ये संबंधित अधिकाऱ्यांना परत पाठविण्याची मागणी थेट मध्यवर्ती खरेदी खात्याकडे केली होती. मात्र या वैद्यकीय अधिकाऱ्यांना अद्यापही मुळ आस्थापनेत पाठविण्यात आलेले नाही. औषध खरेदीसाठी औषधांचे ज्ञान असलेल्या व्यक्तीची नियुक्ती करण्याची गरज आहे. असे असताना या पदावर डॉक्टरांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे रुग्णांवर अन्याय होत आहे, असे मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील एका डॉक्टरने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले.

हेही वाचा… मुंबई :मृत उंदीर सापडल्याप्रकरणी हॉटेलला काम बंद करण्याची एफडीएची नोटीस

एका वैद्यकीय अधिकाऱ्याला महानगरपालिकेच्या रुग्णालयामध्ये सहाय्यक अधिष्ठाता पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. तरीही संबंधित वैद्यकीय अधिकारी मध्यवर्ती खरेदी खाते सोडून आपल्या मुळ आस्थापनेवर रूजू होण्यास तयार नाही.

मध्यवर्ती खरेदी खात्यातील संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांवर गैरव्यवहार केल्याचा आरोप वारंवार होत आहे. असे असतानाही या वैद्यकीय अधिकाऱ्यांना मध्यवर्ती खरेदी खात्यात का ठेवण्यात आले आहे. त्यांच्यावर कोणाचा वरदहस्त आहे. – अभय पांडे, अध्यक्ष, ऑल फूड ॲण्ड ड्रॅग लायसन्स होल्डर फाऊंडेशन