अयोध्येतील राममंदिराचे ई-भूमिपूजन करावे, असे सांगणारे कोकणात जाणाऱ्या नोकरदारांना ई -पासही देऊ शकलेले नाहीत. दलालांचा सुळसुळाट झाला आहे. कोकणात जाण्यासाठी विशेष एसटी गाडय़ा सोडण्यात येतील, असे सांगितले गेले. त्या कुठे आहेत, असा सवाल करीत राज्य सरकारने आता कोकणी माणसाचा अंत पाहू नये, असा इशारा भाजप नेते आमदार अ‍ॅड. आशीष शेलार यांनी दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गणेशोत्सव तोंडावर आला असून कोकणात जाणाऱ्यांना १४ दिवस विलगीकरणात राहण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत. त्यामुळे कोकणात जाण्यासाठी धावपळ सुरू असून ई-पासही उपलब्ध होत नाहीत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dont see the end of employees going to konkan abn
First published on: 04-08-2020 at 00:05 IST