एसटी महामंडळाने २५ ऑक्टोबरपासून दहा दिवसांसाठी केलेल्या हंगामी भाडेवाढीमुळे २४ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. मंगळवारी हंगामी भाडेवाढ मागे घेण्यात आली असून ६ नोव्हेंबरपासून एसटीचे नियमित दर आकारले जातील.
यंदा दिवाळीच्या सुट्टीत २५ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबपर्यंत एसटीच्या साधी, निमआराम व शिवशाही बससेवेसाठी मूळ तिकिटावर सरसकट १० टक्के दरवाढ करण्यात आली होती. या दरवाढीमुळे दररोज सुमारे दोन कोटी रुपये अतिरिक्त महसूल प्राप्त झाला. याप्रमाणे एकूण २४ कोटी रुपयांचा महसूल मिळाल्याचे सांगण्यात आले. विधानसभा निवडणुकीतील आचारसंहितेमुळे हंगामी भाडेवाढ लागू करण्यास एसटी महामंडळाला विलंब झाला, अशी माहिती सूत्रांनी दिली.
