लोकसत्ता खास प्रतिनिधी

मुंबई : एचडीआयएलचे प्रवर्तक सारंग वाधवान व राकेश वाधवान यांच्या बँक गैरव्यवहार प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मे. वीणा डेव्हलपर्सच्या ३६ कोटी ६६ लाख रुपयांच्या मालमत्तेवर टाच आणली आहे. त्यात अंधेरीतील दोन कार्यलये व पालघरमधील २७ दुकानांचा समावेश आहे. याप्रकरणी आतापर्यंत २८१ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर ईडीने टाच आणली आहे.

devendra fadnavis uddhav thackeray
“अमित शाह तुला म्हणाले दोन मोठी…”, उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचा एकेरी उल्लेख करत सांगितलं शहांच्या मातोश्री भेटीवेळी काय घडलं?
UBT leader joins shiv sena shinde group
उबाठा गटाला धक्का, माजी मंत्र्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश; मिलिंद नार्वेकरांवर केले गंभीर आरोप
kirit somaiya
“…म्हणून काही तडजोडी केल्या”, किरीट सोमय्यांचं वक्तव्य चर्चेत; म्हणाले, “आता मविआ सरकार असतं तर…”
What Bhai Jagtap Said?
भाई जगताप यांचं मोठं वक्तव्य, “मी काँग्रेस पक्षासाठी ४३ वर्षे दिली आहेत, आता…”

ईडीने दिलेल्या माहितीनुसार, टाच आणण्यात आलेल्या मालमत्तांमध्ये अंधेरी पूर्व येथील कामलेडोनिया इमारतीतील २२ हजार ३६६ चौरस फुटांची दोन कार्यालये, पालघरमधील डिवानमान येथील वीणा वेलॉसिटी -२ मधील २७ दुकानांचा (क्षेत्रफळ ३५४१ चौरस फूट) समावेश आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) लाचलुपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत एचडीआयएलचे प्रवर्तक राकेश वाधवन आणि एचडीआयएलचे सारंग वाधवन आणि इतरांविरुद्ध दाखल गुन्ह्यांच्या आधारावर ईडीने तपासाला सुरूवात केली होती.

आणखी वाचा-राज ठाकरे आणि महायुतीमध्ये काय ठरलं? संजय शिरसाट म्हणाले, “यावेळी गुढीपाडवा मेळाव्यात…”

येस बँकेने मेसर्स मॅक स्टार मार्केटिंग प्रा.ला मंजूर केलेल्या २०० कोटी रुपयांचा अपहार झाल्याचा आरोप आहे. मॅक स्टार ही मॉरिशस येथील ओशन डेइटी इन्व्हेस्टमेंट होल्डिंग्स लि. (ओडीआयएल) व वाधवान यांच्या मालकीच्या एका कंपनीची संयुक्त कंपनी आहे. मॅक स्टारने २००८ मध्ये अंधेरी पूर्व येथे ‘कॅलेडोनिया, बिझनेस पार्क’ ही इमारत विकसित केली होती. मॅक स्टार कंपनीत ओडीआयएलची ९५ टक्के गुंतवणूक असल्यामुळे त्यांना आर्टिकल असोसिएशनअंतर्गत करारामध्ये विशेष अधिकार देण्यात आले होते. त्याअंतर्गत मॅक स्टारचे संचालक – भागधारकांना मालमत्ता विकण्यास, गहाण ठेवण्यास किंवा २० लाख रुपयांपेक्षा जास्त कर्ज घेण्यास ओडीआयएलची संमती आवश्यकता असल्याची तरतूद होती. मात्र असे असतानाही वाधवान यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून मॅक स्टारला ३०० कोटींपेक्षा जास्तचे नुकसान केल्याचा आरोप आहे. त्याप्रकरणी मुंबईतील एन. एम जोशी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

ईडीच्या तपासानुसार, वाधवान यांनी बेकायदेशीरपणे आणि फसवणूक करून मॅक स्टारची कालेडोनिया बिल्डिंग, अंधेरी पूर्व, येथील मालमत्ता दिवंगत सत्यपाल तलवार आणि धरमपाल तलवार यांच्या मालकीची कंपनी मेसर्स विक्रम होम्स प्रायव्हेट लिमिटेडला हस्तांतरित केली. मॅक स्टारला कोणतेही प्रत्यक्ष पैसे न देता हा गैरव्यवहार करून राकेश वाधवान आणि सारंग वाधवान यांनी मेसर्स मॅक स्टार मार्केटिंग प्रा.लि.ची फसवणूक करून त्यांचे आर्थिक नुकसान केले, असे ईडीच्या तपासात निष्पन्न झाले आहे.

आणखी वाचा-पारपत्रासाठी बनावट कागदपत्र देणाऱ्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल

एकूण २८१ कोटींच्या मालमत्तेवर ईडीकडून टाच

ईडीने नुकतीच याप्रकरणात अंधेरी पूर्व येथील कॅलेडोनिया इमारतीतील कार्यालयीन युनिट्स ७०१, ७०२, ७०३, तसेच लॉबी आणि पॅसेजसह ७०४ असा एकूण ३७५८. १५ चौरस मीटर अशा एकूण ४० कोटी रुपये किमतीच्या मालमत्तेवर ईडीने टाच आणली होती. शनिवारी ३६ कोटी ६६ रुपयांच्या मालमत्तावर टाच आणली. याप्रकरणात आतापर्यंत एकूण २८१ कोटी दोन लाख रुपये किंमतीच्या मालमत्तेवर टाच आणल्याचे ईडीने सांगितले.