मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची कामगिरी महाविकास आघाडीचे सरकार असताना उजवी ठरली होती. त्यामुळे पहिल्या पाच मुख्यमंत्र्यांच्या यादीत उद्धव ठाकरे यांना स्थान मिळवता आले, मात्र विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पहिल्या पाच मुख्यमंत्र्यांच्या यादीत स्थान मिळवता आले नाही. याचा अर्थ राज्यातील जनतेने त्यांना नाकारल्याचे स्पष्ट होते, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते महेश तपासे यांनी लगावला.
‘इंडिया टूडे सी वोटर मूड द नेशन’ या सर्वेक्षणात महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघापैकी महाविकास आघाडीला ३४ जागा मिळतील असे समोर आले आहे. मात्र शिंदे- फडणवीस सरकारच्या वैधतेचा सर्वोच्च न्यायालयात निकाल जेव्हा येईल, त्यावेळी हा आकडा ४० च्या आसपास जाईल, असा विश्वास तपासे यांनी व्यक्त केला.
‘सी वोटरचा’ जो सव्र्हे आला त्यामध्ये एकनाथ शिंदे यांना खूप कमी लोकांचा पाठिंबा असल्याचे दिसते याचा अर्थ राज्यातील जनतेचा कौल कोणत्या दिशेने आहे हे शिंदे समर्थकांनी लक्षात घ्यावे, असेही ते म्हणाले.