मुलुंडमधील एका क्ष-किरण तपासणी केंद्रात महिलांच्या कपडे बदलण्याच्या खोलीत मोबाइल लपवून  अश्लील चित्रफित काढणाऱ्या अन्सार शेख याला भांडुप पोलिसांनी अटक केली.
येथे एक महिला क्ष-किरण तपासणीसाठी आली असता कपडे बदलताना तिला एका पिशवीला छिद्र  दिसले. अधिक तपास केला असता त्या पिशवीत मोबाइल कॅमेरा ठेवला असून त्यात आपले कपडे बदलत असतानाचे चित्रिकरण झाल्याचे तिला आढळले. त्या महिलेने आपल्या पतीला याबाबत सांगितल्यावर या केंद्रात मदतनीस म्हणून काम करणाऱ्या अन्सार शेख याचे हे कृत्य असल्याचे
कळले.
 महिलेच्या पतीने त्याला जाब विचारताच अन्सारने सुऱ्याचा धाक दाखवत तेथून पळ काढला होता. या वेळी त्याने केंद्रातील कर्मचारी महिलेला इजाही केली होती. अखेर त्याला  भांडुप पोलिसांनी अटक केली.