मुंबई पोलिसांची अमली पदार्थ विरोधी शाखा आणि केंद्र सरकारच्या अमली पदार्थ नियंत्रण शाखेने संयुक्तपणे केलेल्या कारवाईत ३८ लाख रुपये किंमतीचे मेफ्रेडोन (एमडी) जप्त करण्यात आले आहे. कारवाईत तीन तस्करांना पकडण्यात आले असून त्यातील एक महिला आहे.
शुक्रवारी अमली पदार्थ विरोधी शाखेचा वांद्रे कक्षाला विक्रोळीच्या टागोर नगर जंक्शन येथे एका कारमधून तस्कर ‘एमडी’ घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार केंद्राच्या अमली पदार्थ नियंत्रण शाखेच्या सहकार्याने संयुक्त कारवाई करण्यात आली.
गाडीतून आलेल्या तीन तस्करांकडून १ हजार ९०० ग्रॅम ‘एमडी’ हस्तगत करण्यात आले. बाजारातील त्याची किंमत ३८ लाख रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले.

तिघांना अटक
रामजान अली लोखंडवाला, आसिफ खान आणि शहनाज सिद्दीक गलियार या तीन तस्करांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.