मुंब्रा येथे एका दहावीच्या विद्यार्थिनीचे अपहरण करून विनयभंग केल्याची घटना गुरूवारी रात्री घडली. याप्रकरणी रिक्षाचालकासह चौघेजण फरार असून पोलिसांनी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. कौसा मुंब्रा येथील मित्तल पार्कमध्ये राहणाऱ्या त्या विद्यार्थिनीने गुरूवारी रात्री क्लासवरून घरी परतण्यासाठी कौसा कब्रस्तानजवळ शेअर रिक्षा पकडली. काही अंतरावर त्या रिक्षात आणखी तीन प्रवासी चढले. त्यांनी रिक्षा निर्जनस्थळी नेत तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला.
संग्रहित लेख, दिनांक 5th Jan 2013 रोजी प्रकाशित
मुंब्रा येथे विद्यार्थिनीचा विनयभंग
मुंब्रा येथे एका दहावीच्या विद्यार्थिनीचे अपहरण करून विनयभंग केल्याची घटना गुरूवारी रात्री घडली. याप्रकरणी रिक्षाचालकासह चौघेजण फरार असून पोलिसांनी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
First published on: 05-01-2013 at 03:37 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eve teasing of student in mumbra