राष्ट्रीय स्वयंसवेक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी राज्यकारभार करणाऱ्या राजाचे वर्तन कसे असावे, यावर महत्त्वाचे विधान केले आहे. मुंबईच्या विलेपार्ले येथील लोकमान्य सेवा संघाच्या १०१ व्या वर्धापनदिनानिमित्ताने केले. ‘सामाजिक परिवर्तन – संस्थांची भूमिका’ या विषयावर सरसंघचालक भागवत यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी मोहन भागवत यांनी विविध विषयांवर भाष्य करताना नागरिकांनी आणि राज्यकारभार करणाऱ्या राज्यकर्त्यांनी कोणती मूल्य जपली पाहीजेत, यावर विवेचन केले.

‘सरसंघचालक मोहन भागवत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नजरकैदेत…’ खळबळजनक आरोपाबाबत जाणून घ्या सविस्तर

MLA Jitendra Awhad alleges that administration is being used for political gain in the state
राज्यात प्रशासनाचा वापर राजकीय स्वार्थासाठी, आमदार जितेंद्र आव्हाड यांचा आरोप
Uddhav Thackeray
“शिवसेनेला नकली सेना म्हणणाऱ्यांना…”, उद्धव ठाकरेंचा भाजपावर थेट प्रहार; म्हणाले “इंजिनाची चाकं…”
raju shetty uddhav thackeray (1)
“…म्हणून मी ठाकरेंच्या मशाल चिन्हावर निवडणूक लढवणार नाही”, राजू शेट्टींनी स्पष्ट केली भूमिका
solapur, Praniti Shinde, Criticizes, BJP, Pulwama Attack, Ram Satpute, lok sabha 2024, election, congress, maharashtra politics, marathi news,
पुलवामा घटनेवर पाच वर्षांनंतर सोलापुरात राजकीय आरोप-प्रत्यारोप

चैनीच्या वस्तूंची खरंच गरज आहे का?

“पैशांची उधळपट्टी न करता समाजात साधेपणाने आणि काटकसरीने रहावे, स्वदेशीची कास धरुन गरजूंना आर्थिक मदत करावी. घरात दोन मोटारगाड्या, महागडा स्मार्ट रंगीत दूरचित्रवाणी संच आदी चैनीच्या वस्तूंची खरोखर गरज आहे का? याचाही प्रत्येक सुजाण नागरिकाने विचार करावा. नागरिकांनी नियमांचे पालन करुन पर्यावरणाचे रक्षण करावे. सुजाण, शिस्तप्रिय व देशभक्त नागरिक आणि समाज असेल, तर तो देश मोठा होतो. यादृष्टीने सामाजिक संस्थांनी नागरिकांमध्ये ही जाणीव व प्रेरणा निर्माण करण्यासाठी मनपरिवर्तनाची जबाबदारी पार पाडावी”, असे आवाहन मोहन भागतव यांनी व्याख्यानादरम्यान बोलताना केले.

“समाजहितासाठी देणगी मागायला लाज वाटायला नको!” सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे प्रतिपादन, म्हणाले…

.. तर राजालाही पायउतार व्हावं लागतं

“राजा हा समाजामुळे असतो आणि नीट राज्यकारभार केला नाही, तर त्याला पायउतारही व्हावे लागते”, अशी अनेक उदाहरणे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “देशाचे उत्थान आणि पतन हे समाजाच्या उत्थान व पतनावर अवलंबून असते. समाजपरिवर्तनात सामाजिक संस्थांसह सर्वांचीच जबाबदारी महत्त्वाची असते”, असे सांगून भागवत यांनी प्रगत देशांमधील नागरिकांचे वर्तन, विचार आणि दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील काही घटनांचा उल्लेख केला.