scorecardresearch

मुंबई: महापालिकांमधील उद्यानांमध्ये सुविधा बंधनकारक

मुंबईमध्ये आमूलाग्र बदल करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून त्यानुसार शहर सुशोभीकरण व अन्य कामे सुरू झाली आहेत.

BMC
मुंबई महानगरपालिका( संग्रहित छायाचित्र )

मुंबईसह राज्यातील सर्वच महापालिका क्षेत्रांतील उद्यानांमध्ये पुरेशी स्वच्छतागृहे तसेच वीज, पाण्याचे पाणी, सुरक्षा आदी सर्व आवश्यक सुविधा तातडीने उपलब्ध करून देतानाच याबाबतचा स्वतंत्र विकास आराखडा तयार करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी दिले.भारती लव्हेकर यांनी मुंबई महानगरपालिका क्षेत्रांमधील उद्यानांमध्ये स्वच्छतागृह, पाणपोई आणि दिव्यांची सोय नसल्याबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नावरील चर्चेदरम्यान मुख्यमंत्री बोलत होते. मुंबईमध्ये आमूलाग्र बदल करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून त्यानुसार शहर सुशोभीकरण व अन्य कामे सुरू झाली आहेत. गेली पंधरा-वीस वर्षे जे झाले नाही, ते आम्ही सुरू केले आहे. मुंबई बदलतेय, सुंदर होतेय, स्वच्छ होतेय. त्यासाठी अनेक निर्णय घेतल्याचे शिंदे यांनी सांगितले. उद्यानासाठी स्वतंत्र आराखडा तयार करण्याची सूचना करण्यात आली आहे.

त्यानुसार या ठिकाणी स्वच्छतागृह, पाणपोई, पथदिवे आणि सुरक्षेची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे त्यांनी या वेळी नमूद केले. त्याचबरोबर मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावर प्रत्येकी १० सुसज्ज स्वच्छतागृहे बांधण्यात येणार असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले या वेळी नाना पटोले, आशीष शेलार, अमिन पटेल, योगेश सागर यांच्यासह अनेक सदस्यांनी यासंदर्भात पालिकेने दिलेल्या लेखी उत्तरावर आक्षेप घेत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली, तर मरिन ड्राइव्हवर फक्त एकच स्वच्छतागृह असल्याकडे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी लक्ष वेधले. त्यावर आवश्यक ठिकाणी अधिक स्वच्छतागृहे उभारण्याची ग्वाही त्यांनी दिली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 22-03-2023 at 03:23 IST

संबंधित बातम्या