गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत असलेला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या शुक्रवारी दुपारी होणार आहे. विधानभवनाच्या प्रांगणात दुपारी चार वाजता मंत्रिमंडळ विस्तार होणार असून, यावेळी शिवसेना आणि भाजपचे प्रत्येकी दहा नेते मंत्रिपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. भाजपच्या इतर मित्रपक्षांपैकी एक ते दोन जणांचा या मंत्रिमंडळात समावेश केला जाऊ शकतो, असेही फडणवीस यांनी सांगितले.
भाजपच्या कोणत्या नेत्यांची मंत्रिपदी वर्णी लागणार हे गुरुवारी रात्री निश्चित होणार आहे. त्याचबरोबर शिवसेनाही गुरुवारी रात्रीपर्यंत आपल्या नेत्यांची नावे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देणार आहे. विस्तारात मंत्रिपदी कोणाची वर्णी लागणार, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.