पुणे येथील उच्च शिक्षण घेणाऱ्या एका युवतीने अभ्यासात लक्ष लागण्यासाठी तसेच मनातल्या इच्छा पुर्ण होण्यासाठी गंडय़ादोऱ्यांचा (तावीज) शोध सुरू केला. पण, या अंधश्रद्धेच्या नादात तिने आपले सर्वस्व गमावल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. मौलवीकडून तावीज बनवून देतो, अशी बतावणी करत तरूणाने तिच्यावर बलात्कार केला. तसेच तिचे नग्न अवस्थेतील छायाचित्र काढून सोशल नेटवर्किंग साईटवर प्रसिद्ध करण्याची धमकी देत ५० हजारांची मागणी केली. या प्रकरणी पीडीत युवतीच्या वडीलांनी तक्रार देताच पोलिसांनी त्याला जेरबंद केले आहे.
नदीम इम्तीहम शेख (२१) असे अटक करण्यात आलेल्या युवकाचे नाव असून तो मुंब्रा येथील आनंद कोळीवाडा परिसरात राहतो. पुणे जिल्ह्य़ातील पुरंदर तालुक्यात २१ वर्षीय पीडीत युवती राहत असून ती हॉटेल मॅनेजमेटचे शिक्षण घेत आहे. तीन महिन्यांपुर्वी ती घाटकोपर परिसरात राहणाऱ्या मावशीच्या घरी सुट्टीनिमित्त आली होती. तिच्या मावशीच्या चप्पल दुकानामध्ये नदीम काम करतो. पीडीत मुलीचे अभ्यासात लक्ष लागत नव्हते तसेच मनातल्या अनेक इच्छा पुर्ण होत नव्हत्या. त्यामुळे ती निराश होती. या संदर्भात अनेक जणांकडून तिने सल्लेही घेतले होते. आपले केस आणि नखे देऊन मौलवीकडून तावीज बनवून घेतले तर मनातली सर्व इच्छा पुर्ण होतील, असा सल्लाही तिला मिळाला होता. दरम्यान, ती तावीजच्या शोधात असल्याचे नदीमने हेरले होते आणि तिला मुंब्रा परिसरातील एका मौलवीकडून तावीज देण्याची बतावणी केली होती. तसेच तावीज घेण्यासाठी शुक्रवारी जावे लागेल, असेही त्याने तिला सांगितले होते. त्यानुसार, जुन महिन्यातील एका शुक्रवारी तो तिला मुंब्रा परिसरात घेऊन गेला. मात्र मौलवीची भेट घडवून आणण्याऐवजी गुंगीचे औषध देऊन त्याने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तिचे नग्न अवस्थेतील छायाचित्रे काढून सोशल नेटवर्किंग साईटवर टाकण्याची धमकी दिली होती. तसेच तिच्याकडे ५० हजार रुपयांची मागणी केली होती. दरम्यान, नदीमच्या मोबाईलमध्ये असलेले पीडित मुलीचे छायाचित्र दुकानात काम करणाऱ्या एका मुलाने पाहिले होते. त्याने याबाबत मुलीच्या मावशीला माहिती दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक एस. आर. नगरकर यांनी दिली.
दिवा येथे महिलेवर बलात्कार
दिवा परिसरात राहणाऱ्या एका ३७ वर्षीय महिलेला धमकी देऊन तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी संदीप निवृत्ती जाधव (रा. सावरकरनगर) याच्याविरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी त्याला अद्याप अटक करण्यात आलेली नसून पोलीस त्याच्या शोधात आहेत. या महिलेशी त्याने जबरदस्तीने जवळीक साधण्याचा प्रयत्न करून हा प्रकार केला.
संग्रहित लेख, दिनांक 5th Sep 2013 रोजी प्रकाशित
अंधश्रद्धेची बळी! : तावीज देण्याचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार
पुणे येथील उच्च शिक्षण घेणाऱ्या एका युवतीने अभ्यासात लक्ष लागण्यासाठी तसेच मनातल्या इच्छा पुर्ण होण्यासाठी गंडय़ादोऱ्यांचा (तावीज) शोध सुरू केला.
First published on: 05-09-2013 at 03:53 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fake spiritual muslim guru arrested for raping college girl