विमानातून बेकायदेशीररित्या त्रिशुळ घेऊन प्रवास केल्याने स्वयंघोषित आध्यात्मिक गुरु राधे माँ विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २०१५ मध्ये ऑगस्ट महिन्यात औरंगाबाद ते मुंबई विमान प्रवासात राधे माँने त्रिशुळ घेऊन प्रवास केला होता. याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर निकाल देताना दंडाधिकारी न्यायालयाने काही दिवसांपूर्वी शस्त्रास्त्र कायद्यातंर्गत राधे माँवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. राधे माँसह सीआयएसएफचे ३ अधिकारी आणि जेट एअरवेजच्या २ अधिकाऱ्यांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी राधे माँ विरोधात मुंबईतील निकी गुप्ता या गृहिणीने छळवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.
संग्रहित लेख, दिनांक 30th Mar 2016 रोजी प्रकाशित
विमान प्रवासात त्रिशुळ बाळगल्याप्रकरणी राधे माँ विरोधात गुन्हा
औरंगाबाद ते मुंबई विमान प्रवासात राधे माँने त्रिशुळ घेऊन प्रवास केला होता.

First published on: 30-03-2016 at 15:42 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fir lodged against self styled godwoman radhe maa for carrying trishul on mumbai flight