Kamala Mills Compound Fire कमला मिल कंपाऊंडमध्ये भीषण आग ; १४ जणांचा मृत्यू मुंबईतील लोअर परळ Lower Parel येथील कमला मिल कंपाऊंडमधील एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर गुरुवारी रात्री भीषण आग लागली. या आगीत १४ जणांचा मृत्यू झाला असून १२ जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये ११ महिलांचा समावेश आहे.
Kamala Mills Compound कमला मिल कंपाऊंडमधील ट्रेड हाऊस इमारतीमध्ये गुरुवारी रात्री साडे बाराच्या सुमारास ‘१ अबव्ह’ या बारमध्ये आग लागली. इमारतीच्या टेरेसवर बांबू आणि प्लास्टिकचे छप्पर असल्याने आग झपाट्याने पसरत गेली. टेरेसवर ‘१ अबव्ह’ आणि त्याच्या बाजूला मोजोस ब्रिस्ट्रो पब आहे. आगीचे लोण तिथेही पोहोचले. ही घटना घडली त्यावेळी तिथे सुमारे ५० हून अधिक जण उपस्थित होते. यातील १४ जणांचा मृत्यू झाला. तर १२ हून अधिक जण जखमी झाले. तर काहींना वेळीच बाहेर पडता आल्याने ते बचावले आहेत. घटनेच्या वेळी बारमध्ये एका तरुणीच्या वाढदिवसाची पार्टी सुरु होती, असे समजते. आग नेमकी कशामुळे आग लागली, हे अद्याप अस्पष्ट आहे. पोलिसांनी ‘१ अबव्ह’ च्या मालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. लाकडी फर्निचर, प्लास्टिक आणि बांबू यामुळे आग पसरत गेली. चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.
14 dead & 14 injured, out of which 2 are critical: BMC on #KamalaMills fire (Earlier visual) pic.twitter.com/KkirCphpNQ
— ANI (@ANI) December 29, 2017
#KamalaMills Fire: Transmission of the TV channels ET Now, Mirror Now, Zoom & TV9 Marathi affected due to the fire. pic.twitter.com/rF07LhfcsR
— ANI (@ANI) December 29, 2017
#WATCH: Last night visuals of fire at #KamalaMills compound in #Mumbai's Lower Parel, the incident has claimed 14 lives. pic.twitter.com/Ud2s6QXTFF
— ANI (@ANI) December 29, 2017
Last night visuals of fire at #KamalaMills compound in #Mumbai's Lower Parel, the incident has claimed 14 lives. pic.twitter.com/wD2vm0o1u6
— ANI (@ANI) December 29, 2017
#KamalaMills Fire Update: FIR under charges of culpable homicide registered against the restaurant '1 Above' where the fire broke out.
— ANI (@ANI) December 29, 2017
This is bloody insane.. #kamalamills stay safe pic.twitter.com/kqQWbc7QCf
— Akshaay (@akshaay_pande) December 28, 2017
कमला मिल कंपाऊंडमध्ये मराठी, इंग्रजी वृत्तवाहिन्यांचे तसेच खासगी कंपन्यांचे कार्यालय आहे. कंपाऊंडमध्ये अंदाजे ४२ रेस्टॉरंट आणि पब आहेत. या आगीचा फटका काही वृत्तवाहिन्यांच्या कार्यालयांनाही बसला आहे. मुंबईचे पालिका आयुक्त अजॉय मेहता यांनी घटनास्थळी येऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
मृतांचे नावे खालील प्रमाणे:
१. प्रमिला (महिला)
२. तेजल गांधी (वय ३६)
३. खुशबू बन्सल
४. विश्व ललानी (वय २३)
५. पारुल लकडावाला (वय ४९)
६. धैर्य ललानी (वय २६)
७. किंजल शहा (वय २१)
८. कविता धरानी (वय ३६)
९. शेफाली जोशी
१०. यशा ठक्कर (वय २२)
११. सरबजीत परेला ( व३०)
१२. प्राची खेतानी (वय ३०)
१३. मनिषा शेशा (वय ४७)
१४. प्रीती राजगिरीया ( वय ४७)