मुंबई : वांद्रे पूर्व येथील एका सरकारी कार्यालयाच्या इमारतीला शनिवारी दुपारी आग लागली. वांद्रे – कुर्ला संकुल परिसरातील बाळराम इमारतीच्या तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर आग लागली होती. आग विझवण्याचे प्रयत्न अग्निशमन दलामार्फत सुरू आहेत.

वांद्रे येथील कुटुंब न्यायालयाच्या समोरील सरकारी इमारतीत दुपारी ३.३० च्या सुमारास आग लागली. सात मजली इमारतीच्या तिसऱ्या व चौथ्या मजल्यावर आग लागली होती. क्षणार्धात आगीने अक्राळविक्राळ रुप धारण केले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे चार बंब, पाण्याचे तीन ट्रॅंकर घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामकांनी युद्धपातळीवर बाचवकार्य हाती घेतले.

हेही वाचा…पुनर्मूल्यांकन अर्जांचा गोंधळ: मुंबई विद्यापीठाच्या विधि शाखेच्या नवव्या सत्राचे विद्यार्थी संभ्रमात

दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या खिडकीतून आगीचे लोळ व धूर बाहेर पडत होते. आग विझवण्याचे काम संध्याकाळी उशीरापर्यंत सुरू होते. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.