गॅ्रंटरोड येथील एका घरात शिरून वृद्ध महिला आणि तिच्या मुलावर हल्ला करून पाच लाखांचा ऐवज लुटणाऱ्या पाच जणांच्या टोळीला दादासाहेब भडकमकर मार्ग पोलिसांनी अटक केली आहे. ३ सप्टेंबर रोजी ही घटना घडली होती.
गॅ्रंट रोडच्या ‘असिमयल’ इमारतीत प्रभाबेन गाला (६७) या आपल्या मुलासह राहतात. ३ सप्टेंबर रोजी दुपारी पावणेतीनच्या सुमारास असिम मलकी आपल्या तीन साथीदारांसह पाणी पिण्याच्या बहाण्याने गाला यांच्या घरात आला. घरात शिरल्यानंतर मलकी व त्याच्या दोन साथीदारांनी गाला आणि त्यांचा मुलगा अजित कुमार या दोघांवर चॉपरने वार केले आणि रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा एकूण सुमारे पाच लाखांचा ऐवज लुटून नेला. दादासाहेब भडकमकर मार्ग पोलिसांनी या प्रकरणी मुंब्रा येथून असिम मलकी( २३), सर्फराज गौरी, आमिर मलकी आणि अब्बास अली या चौघांना अटक केली.
संग्रहित लेख, दिनांक 12th Sep 2013 रोजी प्रकाशित
दरोडा घालून फरार झालेल्या पाच गुंडांना अटक
गॅ्रंटरोड येथील एका घरात शिरून वृद्ध महिला आणि तिच्या मुलावर हल्ला करून पाच लाखांचा ऐवज लुटणाऱ्या पाच जणांच्या टोळीला दादासाहेब भडकमकर मार्ग पोलिसांनी अटक केली आहे.
First published on: 12-09-2013 at 01:25 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Five robber arrested who escape after robbery