महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांना प्रकृती खालावल्यामुळे २२ मे रोजी हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सुरूवातीला त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जातं होतं. पण, नंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून, आज ( १२ जून ) मनोहर जोशी यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शिवसेनेच्या जुन्या फळीतील नैत्यांपैकी एक म्हणून मनोहर जोशी यांची ओळख आहे. शिवसेनेचे ते पहिले मुख्यमंत्री आहेत. गेल्या काही काळापासून ते राजकारणात सक्रिय नव्हते. मेंदूशी संबंधित व्याधी मनोहर जोशी यांना आहे. २२ मे रोजी अस्वस्थ वाटू लागल्यानंतर मनोहर जोशी तातडीने हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

Kishori Pednekar, pre-arrest bail,
करोना वैद्यकीय साहित्य खरेदीतील गैरव्यवहार प्रकरण : पोलिसांच्या ना हरकतीनंतर किशोरी पेडणेकर यांना अटकपूर्व जामीन
wardha lok sabha constituency, Amar Kale, sharad pawar ncp, amra kale campaign, Faces Setback , Complaints of Financial Mismanagement, amar kale not spending money, finance in campaign,
वर्धा : ‘हवेत राहू नका ‘, अमर काळे यांना सहकाऱ्यांचा इशारा
Wardha Lok Sabha, Amar Kale,
वर्धा : “कुणी घर देता कां घर…”, अमर काळे यांची शोधाशोध; कार्यालयासाठी…
If you want to talk negatively leave gathering says Minister Chandrakant Patil
नकारात्मक बोलायचे असेल तर मेळाव्यातून बाहेर जा; मंत्री चंद्रकांत पाटील यांची महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना तंबी

हेही वाचा : “७०० एकर जमीन कुठून आणली”, खैरेंच्या विधानावर संदीपान भुमरेंचं प्रत्युत्तर; म्हणाले…

तिथे आयसीयूत मनोहर जोशी यांच्यावर उपचार सुरू होते. सुरुवातीस प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जातं होतं. पण, आता प्रकृतीत सुधारणा झाल्याने आज सायंकाळी रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं आहे.

ठाकरेंशी एकनिष्ठ

एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेत मोठी फूट पडली. चाळीस आमदार काही खासदार यांनी एकनाथ शिंदेबरोबर जात भाजपाशी युती केली. अनेक ज्येष्ठ नेतेही या काळात उद्धव ठाकरे यांना सोडून एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेले. मात्र, मनोहर जोशी यांनी या काळातही ठाकरेंची साथ सोडली नाही. सध्याही ते शिवसेनेच्या ठाकरे गटात आहेत.