scorecardresearch

कांदिवलीत प्रेम प्रकरणावरून आई-बहिणीची हत्या करुन मुलीने प्रियकरासह केली आत्महत्या

रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावर दोन व्यक्ती गळफास लावून लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्या

CRIME
(प्रातिनिधिक छायाचित्र)

प्रेम प्रकरणाला आई आणि मोठ्या बहिणीने केलेला विरोध आणि यावरून वारंवार होणाऱ्या वादाला कंटाळून अल्पवयीन मुलीनेच प्रियकराच्या मदतीने कोयत्याने आई आणि मोठ्या बहिणीचा खून केला. त्यानंतर प्रेमी युगलाने एकाच दोरीने गळफास लावून आत्महत्या करण्याची घटना खळबळजनक घटना कांदिवलीत गुरुवारी मध्यरात्री घडली.

कांदिवली पश्चिमेकडील भागात बुधवारी रात्री साडेअकराच्या सुमारास एक व्यक्ती धारदार कोयता घेऊन फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी कोयता घेऊन फिरणारी व्यक्ती राधाबाई रुग्णालयाच्या आत असल्याचे सांगितले. पोलीस पथकाने रुग्णालयात पाहणी केली असता तेथील लोखंडी शटर कुलूप लावून बंद केल्याचे निदर्शनास आले. कुलूप तोडून आत प्रवेश केल्यावर जमिनीवर रक्ताचे डाग पडल्याचे दृष्टीस पडले. पोलीस पथकाला दुसऱ्या मजल्यावर रक्ताच्या थारोळ्यात एक महिला जखमी अवस्थेत दिसली. तर, स्वयंपाकघरात दुसरी महिला जखमी अवस्थेत पडली होती. पहिल्या मजल्यावरील एक बंद खोली उघडली असता आतमध्ये एक महिला आणि पुरुषाने एकाच दोरीने गळफास लावूल्याचे निदर्शनास आले.

या सर्वांना उपचारासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय पाठविण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच चौघांचा मृत्यू झाल्याचे सांगितले.

एक डॉक्टर महिला आपल्या दोन मुलींसह येथे वास्तव्यस होत्या. त्यांच्याकडे वाहनचालक म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीबरोबर डॉक्टर महिलेच्या अल्पवयीन मुलीचे प्रेमप्रकरण सुरू होते. यावरुन कुटुंबात वारंवार वाद होत होते. या वादातूनच अल्पवयीन मुलीने प्रियकराच्या मदतीने कोयत्याने आई आणि बहिणीची हत्त्या केल्याचे आणि त्यानंतर त्यांनी आत्महत्या केल्याचे चौकशीत उघड झाले.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Four bodies found in kandivali and four to five suicide notes were found mumbai print news msr

ताज्या बातम्या