मुंबईच्या डी. बी. मार्ग या भागातील कृष्णा बिल्डिंगवर छापा मारत मुंबई पोलिसांनी देहविक्रय करणाऱ्या चार मुलींना ताब्यात घेतले.
या चार मुलींबरोबरच त्यांच्यावर देखरेख करणाऱ्या चार महिलांनाही पोलिसांनी अटक केली आहे.
ही कारवाई  रविवारी रात्री उशिरा करण्यात आली.   या चार मुलींपैकी एकही मुलगी अल्पवयीन नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.
 विशेष म्हणजे गेल्या वर्षीही याच भागातील एका बिल्डिंगवर मारलेल्या छाप्यात ३५०हून अधिक मुलींना ताब्यात घेण्यात आले
होते.