राज्याचे उत्पादन शुल्कमंत्री गणेश नाईक यांचा पुतण्या वैभव नाईक याने शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकला.
वैभव नाईक हे दिवंगत माजी महापौर तुकाराम नाईक यांचे ज्येष्ठ चिरंजीव असून गेली अनेक दिवस काका-पुतण्यामध्ये बेबनाव होता. काकांचे प्रेम न मिळाल्यामुळे आपण राष्ट्रवादी सोडत असून दुसऱ्या कोणत्याही पक्षाने संधी दिल्यास त्यात प्रवेश करणार आहोत, असे त्याने सांगितले.
दरम्यान वैभव नाईक शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे समजते. गेल्या काही दिवसांपासून वैभव नाईक नाराज असल्याचे समतजे. वाढदिवसानिमित्तही त्यांच्या समर्थकांनी मोठय़ा प्रमाणात फलक लावले होते. त्यावेळी वैभव नाईक मोठय़ा प्रमाणात चर्चेत आले होते.