मुंबई : सशस्त्र दरोड्याच्या २९ वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेत सहभागी असलेल्या छोटा राजन टोळीच्या गुंडाला अटक करण्यात गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. आरोपीविरोधात मुंबई व गुजरातमध्ये १० गुन्ह्यांची नोंद आहे.
चेंबूर, सिंधी कॅम्प येथील एका इस्टेट एजंटच्या दुकानात अटक आरोपी साकीर बरकत अली लखानी (५९) व त्याचे छोटा राजन टोळीतील चार साथीदार यांनी घातक शस्त्रांद्वारे १९९४ मध्ये दरोडा टाकला होता. त्यांना अडवण्यासाठी आलेल्या पोलीस पथकावरही त्यांनी हल्ला केला होता. याप्रकरणी गुन्हे शाखेने भादंवि कलम ३९९, ३०७, ३५३, ४०२ व भारतीय हत्यार कायदा कलम २७ अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. त्याप्रकरणी लखानीला अटक झाली होती. सत्र न्यायालयाने आरोपीला पाच वर्षांची शिक्षा सुनावली होती. परंतु अटक आरोपीचे इतर ३ साथीदार हे पोलीस चकमकीत ठार झाल्यानंतर लखानी हा फरार झाला होता. त्यामुळे सत्र न्यायालयाने त्याच्याविरुद्ध अजामिनपात्र वॉरंट काढले होते. याप्रकरणी तंत्रज्ञानाच्या मदतीने पोलिसांनी तपास केला असता आरोपी गुजरातमधील सूरत येथे लपला असल्याचे निष्पन्न झाले. कक्ष ५ च्या पोलीस अधिकाऱ्यांनी गुजरातला जाऊन पाहणी केली असता आरोपी ओळख लपवून राहत असल्याचे समजले. याप्रकरणी त्याला ताब्यात घेण्यात आले.
हेही वाचा – सीमा हैदर आणि २५ जण पाकिस्तानातून आले आहेत, मुंबई पोलिसांना दूरध्वनी, संशयीत ताब्यात
लखानी विरोधात मुंबई व गुजरात येथे दरोडा, जबरी चोरी, मोटार वाहन चोरी व फसवणुकीचे असे एकूण १० गुन्हे नोंद आहेत. तसेच गुजरात येथील ओधव पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल असून त्याची फरार आरोपी म्हणून नोंद आहे. आरोपी त्यावेळी अॅन्टॉपहिल परिसरात राहत होता.