गोराई ते नरिमन पॉईंटपर्यंत कोस्टल रोड प्रकल्प अजेंड्यावर असून मुंबई महापालिकेच्या अंतर्गत हा प्रकल्प पूर्ण करणार असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी सांगितले आहे. मुंबईत घेतलेल्या पत्रकारपरिषदेत ते बोलत होते.
उध्दव ठाकरे म्हणाले की, मुंबईला पूर्व किनारपट्टीदेखील आहे याची कल्पनाही काही जणांना नाही. मुंबईच्या पूर्व सागरी किनारपट्टीवर ९११ एकर जागा अतिरिक्त जागा उपलब्ध होऊ शकते. त्या जागेवर बीपीटी सारखा प्रकल्प राबवता येऊ शकतो.” तसेच त्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार असल्याचेही उध्दव ठाकरे यांनी सांगितले.
महालक्ष्मी येथील रेसकोर्स जागेवरील भूमिकेबाबत बोलत असताना, सर्वानुमते रेसकोर्स मुंबईच्या बाहेरही हलवता येऊ शकतो आणि त्या ठिकाणी जागतिक पातळीवरील उद्यान उभारता येऊ शकेल असा मानस असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले. तसेच उद्यानाचा आराखडाही तयार असल्याचेही त्यांनी सांगितले.