पोलीस दलातील उल्लेखनीय सेवेबद्दल मुंबई पोलीस दलातील ९२ पोलीस अधिकाऱ्यांना गुरुवारी राष्ट्रपती पदक देऊन सन्मानित करण्यात आले. गुरुवारी राजभवनात झालेल्या एका सोहळ्यात राज्यपाल के. शंकरनारायणन यांच्या हस्ते राष्ट्रपती पोलीस पदक तसेच गुणवत्तापूर्ण सेवा पदक प्रदान करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री आर. आर. पाटील, पोलीस महासंचालक संजीव दयाळ यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.
पदक विजेत्यांमध्ये नागपूरचे पोलीस आयुक्त कौशलकुमार पाठक, मुंबई रेल्वेचे अतिरीक्त पोलीस महासंचालक भगवंत मोरे, पुणे गुन्हे अन्वेषण विभागाचे अतिरीक्त पोलीस महासंचलाक अशोक धिवरे आदींचा समावेश होता. तर ८६ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदके प्रदान करण्यात आली.
संग्रहित लेख, दिनांक 4th Jan 2013 रोजी प्रकाशित
राज्यपालांच्या हस्ते ९२ पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना पोलीस पदके
पोलीस दलातील उल्लेखनीय सेवेबद्दल मुंबई पोलीस दलातील ९२ पोलीस अधिकाऱ्यांना गुरुवारी राष्ट्रपती पदक देऊन सन्मानित करण्यात आले. गुरुवारी राजभवनात झालेल्या एका सोहळ्यात राज्यपाल के. शंकरनारायणन यांच्या हस्ते राष्ट्रपती पोलीस पदक तसेच गुणवत्तापूर्ण सेवा पदक प्रदान करण्यात आले.
First published on: 04-01-2013 at 05:33 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Governor k sankarnarayanan presented the presidents police medals to 92 police officers