मुंबई : बदलता काळ, धोरणे, बाजारपेठेची गरज या अनुषंगाने कला, विज्ञान, वाणिज्य, वैद्यकीय, अभियांत्रिकी, स्पर्धा परीक्षा, डिजिटल माध्यमे आदी विविध क्षेत्रांतील संधींची ओळख करून देणारी ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ ही कार्यशाळा २ व ३ जून रोजी ठाण्यातील टिपटॉप प्लाझा येथे होणार आहे. सर्व प्रश्न व शंकांचे निरसन तज्ज्ञांकरवी करण्याचे व्यासपीठ यानिमित्ताने विद्यार्थ्यांना मिळणार आहे. कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी आजपासून प्रवेशिका मिळणार आहेत. त्याचबरोबर ऑनलाइन नोंदणीही करता येणार आहे.

दहावी, बारावीनंतर करिअरचा मार्ग निवडताना कोणती काळजी घ्यावी, कोणत्या क्षेत्रात करिअरच्या अधिक संधी निर्माण झाल्या आहेत, कोणत्या क्षेत्रात अधिक वाव आहे यांसह विविध क्षेत्रे, नव्या संधींची सखोल माहिती, तणावाला सामोरे कसे जायचे, नव्या शिक्षण धोरणामुळे होणारे बदल आदी विविध विषयांवर विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना थेट तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. त्याचबरोबर विविध शंकांचे निरसनही होणार आहे.

mpsc mantra study current affairs State National International Level Events
mpsc मंत्र: चालू घडामोडी अभ्यासाचा ‘आधार’
Ayodhya darshan lured by Yogi Adityanath Claims to make all arrangements for the visitors
योगी आदित्यनाथ यांच्याकडून अयोध्या दर्शनाचे आमिष! दर्शनाला येणाऱ्यांची सर्व व्यवस्था करण्याचा दावा
gaanewali program at tarun tejankit
सक्षम भविष्याचे स्वप्न सत्यात उतरवणाऱ्या प्रज्ञेचा सन्मान
piyush goyal
लखलखत्या तरुण तेजांकितांचा आज गौरव; केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पियूष गोयल प्रमुख अतिथी

‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ या कार्यशाळेत दोन्ही दिवस सारख्याच विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे. यामुळे विद्यार्थी व पालक त्यांच्या सोयीनुसार कोणत्याही एका दिवसाची निवड करू शकतात. सदर कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी नावनोंदणी आवश्यक आहे.