एच पश्चिम वॉर्ड

एकीकडे समुद्राच्या फेसाळणाऱ्या लाटा, उंचावर दिसणारे माउंट मेरीचे चर्च, ऐतिहासिक वांद्रे किल्ला आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील तारेतारकांची घरे.. पश्चिम उपनगरातील उच्चभ्रू लोकवस्तीच्या या परिसरात इतिहास व ऐश्वर्य यांचा मिलाफ झाला आहे. पाली हिल, वांद्रे किनारा या भागातील गल्ल्यांमधील टुमदार बंगले आता इतिहासजमा होत असतानाच आलिशान इमारतींनी या भागाची शान कायम ठेवली आहे. येथील शांत गल्ल्यांमध्ये हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक स्टार कलावंत सहज चालतानाही नजरेस पडतात. अनेक पिढय़ांपासून वास्तव्य असल्याने रहिवासी एकमेकांना ओळखतात आणि गटागटाने प्रश्नही सोडवतात. उच्चविद्याविभूषित आणि स्वत:च्या हक्कांविषयी कायम जागरूक असलेल्या रहिवाशांमुळे या भागात शहराच्या इतर भागांत जाणवणाऱ्या नागरी समस्या तेवढय़ा तीव्रतेने जाणवत नाहीत. त्यातच या समस्यांचे निराकरण करण्यासाठी अनेक स्थानिक व्यवस्थापन समित्या (एएलएम) स्थापन झाल्या आहेत. या समित्यांकडून सातत्याने नागरी समस्यांचा मागोवा घेतला जात असल्याने येथे प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही कायम सतर्क राहावे लागते.

Encounter in Abujhmad, naxalite Encounter Abujhmad, 10 naxalites killed, 10 naxalites killed near gadchiroli, naxalite news, chhattisgarh news, marathi news, naxali news, marathi news,
अबुझमाड जंगलात चकमक, १० नक्षलवादी ठार, छत्तीसगड पोलिसांची मोठी कारवाई
glacial lake outburst isro
इस्रोच्या अहवालातून हिमनदी तलावांबाबतचे धक्कादायक वास्तव उघड; भविष्यात तलावफुटीच्या घटना वाढणार?
Prostitution by pretending of Lotus Spa in Nagpur
नागपुरात ‘लोटस स्पा’च्या आड देहव्यापार…
Rare Maldhok Bird Chick Born at Conservation Breeding Center in Rajasthan
गंभीर धोक्यातील माळढोकसाठी आशेचा किरण…. जैसलमेरच्या प्रजनन केंद्रात….

त्यातच प्रशासनाकडून हाती घेण्यात येणाऱ्या अनेक प्रकल्पांची प्रायोगिक सुरुवात करण्यातही रहिवासी आघाडीवर असतात. वांद्रे येथील अनेक सोसायटय़ांमध्ये शून्य कचरा मोहीम यशस्वी ठरली आहे. शहरातील इतर समुद्रकिनाऱ्यांवर जाणवणारी अस्वच्छतेची समस्या या ठिकाणी फार पूर्वीच सोडवण्यात आली आहे. कदाचित समस्या सुटत असल्याने म्हणा किंवा प्रभाव टाकून कामे करून घेणे शक्य असल्याने म्हणा, पण या भागातील मतदानाचा टक्का शहरात सर्वात कमी आहे. मतदान वाढवण्यासाठी स्थानिक संस्था प्रयत्न करीत असल्या तरी त्यांना अद्याप यश आलेले नाही. एकीकडे ही उच्चभ्रू वस्ती असतानाच खारदांडा येथील कोळी समाजाची पूर्वापार वस्तीही या भागात आहे. त्यामुळे कोळी बांधवांचे सर्व सणसमारंभही या भागात अगदी दणक्यात साजरे होतात.

  • अंतर्गत भाग : वांद्रे, खार, सांताक्रुझ, मीलन सबवे, माहिम कॉजवे

प्रभागांच्या समस्या

भटकी गुरे कबुतरे

  • उच्चभ्रू वस्ती असली तरी धार्मिक कारणांमळे कबुतर व गाईंना दिले जाणारे चारा पाणी यामुळे या भागातील भटक्या पशुपक्ष्यांची समस्या वाढली आहे. मात्र याला धार्मिक रंग असल्याने इतर समस्यांवर तातडीने उपाययोजना होत असली तरी याबाबत प्रशासनाकडून उदासीनता दाखवली जाते.

वाहतूक कोंडी पार्किंग

  • पूर्वी बनवलेल्या गल्ल्या आता मुख्य रस्ते झाले आहेत. त्यातच प्रत्येकाच्या घरी तीन ते चार गाडय़ा असल्याने या भागात प्रचंड वाहतूक कोंडी होते. इमारतीत गाडय़ा लावण्यासाठी मर्यादित जागा असल्याने अनेकांच्या गाडय़ा रस्त्यावर महिनोन्महिने ठेवल्या जातात. त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडते.

पबचा त्रास

  • दिवसा शांत असणाऱ्या वांद्रे, खारमधील गल्ल्या रात्री आठनंतर गजबजू लागतात. अनेक निवासी भागांमध्ये पब, उपाहारगृहांची संख्या वाढली असून रात्रभर येत-जात असलेले ग्राहक, त्यांच्या गाडय़ा, हॉर्नचे आवाज यामुळे त्रास होत असल्याची तक्रार रहिवासी करतात.

शून्य कचऱ्यासाठी करात सवलतीची मागणी

  • स्वच्छ मुंबई अभियानाअंतर्गत वांद्रे येथील अनेक इमारतींनी शून्य कचरा मोहिमेची सुरुवात केली आहे. मध्यंतरी एका बँकेकडून घेतल्या गेलेल्या स्पर्धेत ४० इमारतींना ही मोहीम राबवल्याबद्दल लाखो रुपयांची बक्षिसे दिली गेली. पालिकेच्या कचरा व्यवस्थापनावरील ताण यामुळे कमी होत असल्याने त्या बदल्यात पालिकेने या इमारतींवरील मालमत्ता करात सवलत द्यावी, अशी मागणी आता स्थानिक संस्था करीत आहेत.

मीलन सबवेची तुंबई

  • गझधरबंद येथील उदंचन केंद्र सुरू झाल्यावर मीलन सबवेमध्ये तुंबणाऱ्या पाण्याची समस्या कमी होण्याची शक्यता होती. मात्र हे केंद्र सुरू होण्यासाठी अनेक वर्षे वाट पाहावी लागली असून या पावसाळ्यातही मीलन सबवेसह बोरा नाला, जुना खार या भागात पाणी अनेकदा तुंबले होते. पुढील वर्षी हे केंद्र कार्यान्वित होण्याची शक्यता आहे.

अन्य समस्या

  • सर्व मुंबईला असलेल्या रस्ते व खड्डय़ांची समस्या या भागातही आहे. वांद्रे येथील ४० रस्त्यांचे नूतनीकरण या वर्षांत होणार असल्याने किमान पुढच्या वर्षीही खड्डय़ांमधून प्रवास करावा लागणार नाही, असे नागरिकांना वाटते.
  • फेरीवाल्यांची समस्या या भागातही आहे. नागरिकांना रस्त्यांवरून भाजी घेणे सोयीचे पडत असले तरी त्यामुळे वाहतुकीची कोंडी व परिसर अस्वच्छता होते

सध्याचे नगरसेवक

* प्रभाग९२

नगरसेवक – गीता चव्हाण

* प्रभाव९३

नगरसेवक – अलका केरकर

* प्रभाग९४

नगरसेवक – सुनीता वावेकर

* प्रभाग९५

नगरसेवक – आसिफ झकेरिया

* प्रभाग९६

नगरसेवक – कॅरन डी’मेलो

* प्रभाग९७

तनवीर पटेल

फेररचनेनंतरची प्रभाग रचना 

प्रभाग ९७

  • लोकसंख्या – ५४,२२४
  • आरक्षण – खुला
  • प्रभाग क्षेत्र – खिरानगर, मुक्तानंद पार्क, नवयुग कॉलनी, एमएसईबी कॉलनी, सांताक्रूझ बस आगार

प्रभाग ९८

  • लोकसंख्या – ५७,६८०
  • आरक्षण – खुला
  • प्रभाग क्षेत्र – वेलिंग्टन जिमखाना, डॉ. आंबेडकरनगर, खार जिमखाना, रोटरी क्लब

प्रभाग ९९

  • लोकसंख्या – ५३६१५
  • आरक्षण – अनुसूचित जमाती
  • प्रभाग क्षेत्र – खारदांडा, दांडा व्हिलेज, गोविंदनगर, कोळीवाडा

प्रभाग १००

  • लोकसंख्या – ५३०००
  • आरक्षण – मागासवर्ग महिला
  • प्रभाग क्षेत्र – पाली व्हिलेज, पटवर्धन व्हिलेज, युनियन पार्क, पाली हिल

* प्रभाग १०१

  • लोकसंख्या – ५५,४९८
  • आरक्षण – खुला
  • प्रभाग क्षेत्र – वांद्रे तलाव, नॅशनल लायब्ररी, चिंबई व्हिलेज, भाभा रुग्णालय

* प्रभाग १०२

  • लोकसंख्या – ५५,४७०
  • आरक्षण – महिला सर्वसाधारण
  • प्रभाग क्षेत्र – संतोषनगर, वांद्रे रेक्लेमेशन, वांद्रे बस आगार, ओएनजीसी कॉलनी

काँग्रेसचे पारडे जड

एच पश्चिममधील सहापैकी चार मतदारसंघ काँग्रेसकडे आहेत. वांद्रे येथील उच्चभ्रू, कॉस्मोपॉलिटन त्यातही ख्रिश्चनबहुल वस्तीत काँग्रेसचे पारडे नेहमीच जड राहिले आहे. येथील नागरिकांप्रमाणे नगरसेवकही कायम सतर्क असल्याने निवडणुकांमध्ये फार धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता कमी आहे. खार येथील मतदारसंघातून भाजपाच्या आशीष शेलार यांनी जम बसवला. आता आमदार झालेल्या शेलार यांच्या जागी अलका केरकर निवडून आल्या व उपमहापौर झाल्या तर सांताक्रूझ मतदारसंघात मनसेच्या तिकिटावर निवडून आलेल्या नगरसेविकेने प्रभाग अध्यक्षपदाच्या निवडणुकीआधी शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे या जागेवर निवडणूक चुरशीची होऊ शकेल.

अतिक्रमण आणि फेरीवाले या प्रमुख समस्या आहेत. गेल्या वर्षभरात नवीन वॉर्ड अधिकाऱ्यांनी अतिक्रमण तोडली आहेत. त्यामुळे जरब बसली आहे. फेरीवाल्यांची डोकेदुखी मात्र कायम आहे. या फेरीवाल्यांवर कारवाई सुरू असते. मात्र ते पुन्हा येतात. रेल्वे स्थानकाबाहेरचा कबुतरखाना आणि बाजाराच्या परिसरात फिरत असलेल्या गाईंची समस्याही सोडवायला हवी.

आनंदिनी ठाकूर, खार रेसिडन्स असोसिएशन

शांत परिसर असलेल्या वांद्रे येथे नाइट लाइफमुळे रहिवाशांना त्रास होत आहे. निवासी भागात पब आणि उपाहारगृहांची संख्या वाढली आहे. त्यामुळे लहान मुले, आजारी व्यक्ती, वृद्ध यांच्यासोबत सामान्यांनाही आवाजाचा त्रास होतो. रस्ते, वाहतूक कोंडी, पार्किंग अशा संपूर्ण शहराला भेडसावणाऱ्या समस्या इथे आहेतच पण कांतवाडीसारख्या भागात नीट पाणीपुरवठा होत नसल्याने वर्षांतील अनेक दिवस टँकरवर अवलंबून राहावे लागते.

सुमायरा अब्दुलाली, रहिवासी

ओला व सुका कचरा वेगळा करून अनेक सोसायटय़ांनी शून्य कचरा मोहीम राबवली आहे. त्यामुळे पालिकेच्या कचरा वाहून नेण्याच्या तसेच त्याची विल्हेवाट लावण्याच्या खर्चात वाढ झाली आहे. मात्र त्या बदल्यात पालिकेकडून या सोसायटय़ांना कोणतीही प्रोत्साहनपर सवलत मिळत नाही. कॉन्व्हेन्ट शाळेच्या पदपथावर असलेल्या झोपडय़ांमुळे गेल्या सहा महिन्यांत तीन विद्यार्थ्यांचा अपघात झाला होता. स्थानिक नगरसेवक व आमदारांना ही बाब वारंवार सांगूनही ही घरे उठवली गेली नाहीत.

शमा कुलकर्णी, अग्नी संस्था