हार्बर रेल्वेमार्गावर वळाडा-शिवडी दरम्यान रुळाला तडा गेल्याने ठप्प झालेली वाहतूक पूर्ववत झाली आहे. बदललेल्या वेळापत्रकामुळे आधीपासूनच गेले काही दिवस विस्कळीत झालेली हार्बर रेल्वेसेवा गुरूवारी सकाळी ऐनगर्दीच्या वेळी रेल्वेरुळाला तडा गेल्याने पूर्णपणे ठप्प पडली होती. त्यामुळे प्रवाशांना अतोनात हाल सहन करावे लागले. वडाळा, शिवडी, चुनाभट्टी या स्थानकांवर प्रचंड गर्दी झाली होती. हार्बर मार्गावरील वाहतूक ठप्प पडल्याने रेल्वे प्रशानसनाने कुर्ला ते छत्रपती शिवाजी टर्मिनस हा प्रवास मध्य रेल्वेच्या मार्गाने करण्याची मुभा देऊन हार्बर मार्गावरील प्रवाशांची कोंडी कमी करण्याचा प्रयत्न केला. रुळाच्या दुरूस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर तासाभराने वाहतूक सुरूळीत सुरू झाली.
संग्रहित लेख, दिनांक 4th Feb 2016 रोजी प्रकाशित
रेल्वेरुळाला तडा गेल्याने विस्कळीत झालेली हार्बर रेल्वे पूर्ववत
वडाळा-शिवडी दरम्यान रेल्वेरुळाला तडा
Written by लोकसत्ता टीमविश्वनाथ गरुड
Updated:

First published on: 04-02-2016 at 10:52 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Harbour line local train service delayed