वाशीत चरस विक्रीसाठी आलेल्या मोहमद कामील मोहमद इरफान अन्सारी (२५)  या तरुणाला शुक्रवारी रात्री नवी मुंबई पोलिसांनी अटक केली. नौशाद (रा. कुर्ला) हा त्याचा साथीदार अंधाराचा फायदा घेत फरारी झाला. आरोपीकडून सुमारे २२ लाख रुपयांचे ४ किलो चरस हस्तगत करण्यात आले आहे. वाशी न्यायालयाने त्याची पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.
मोहमद हा गोंवडीतील इंदिरानगर झोपडपट्टीत राहतो. वाशी सेक्टर १७ येथे दोन जण चरस विकण्यासाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट २ चे पोलीस निरीक्षक अधिकराव पोळ यांना मिळाली होती. पोलीस आयुक्त के. एल. प्रसाद , गुन्हे शाखेचे उपायुक्त श्रीकांत पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली पोळ यांच्या पथकाने सापळा लावला होता. त्यानुसार ही कारवाई झाली. नौशाद याचा शोध सुरु आहे.