हॉटेल व्यावसायिकाकडून ५५ हजारांची लाच घेताना एका हेड कॉन्स्टेबलला मंगळवारी रात्री नवी मुंबईमध्ये अटक करण्यात आली. जयसिंग राठोड असे त्याचे नाव आहे. ठाणे आणि नवी मुंबईमधील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी सापळा लावून ही कारवाई केली. नवी मुंबईतील सीबीडी बेलापूरमधील सेक्टर १५ येथील एका हॉटेलमध्ये लाच घेण्यासाठी राठोड मंगळवारी संध्याकाळी आले होते. हॉटेलमधील कर्मचाऱयाकडून ५५ हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱयांनी त्यांना रंगेहाथ पकडले.