नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेले आणि सध्या नागपूर कारागृहात असलेले प्रो. जी. एन. साईबाबा यांच्या आरोग्याचा वैद्यकीय अहवाल सादर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने सरकारसह नागपूर पोलीस आयुक्त, कारागृह अधीक्षक यांना बुधवारी दिले.
पक्षाघाताच्या झटक्यानंतर साईबाबा यांना ९० टक्के अपंगत्त्व आले असून ते अंथरुणाला खिळून आहेत. त्यांच्या प्रकृतीबद्दल सामाजिक कार्यकर्त्यां पूर्णिमा उपाध्याय यांनी न्यायालयाशी पत्रव्यवहार केला होता. त्यांच्या पत्राची मुख्य न्यायमूर्ती मोहित शहा आणि न्यायमूर्ती अनिल मेनन यांच्या खंडपीठाने गंभीर दखल घेत त्याचे याचिकेमध्ये रुपांतर केले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 11th Jun 2015 रोजी प्रकाशित
प्रो. साईबाबा यांचा वैद्यकीय अहवाल सादर करण्याचे न्यायालयाचे आदेश
साईबाबा यांच्या आरोग्याचा वैद्यकीय अहवाल सादर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने सरकारसह नागपूर पोलीस आयुक्त, कारागृह अधीक्षक यांना बुधवारी दिले.
First published on: 11-06-2015 at 02:51 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: High court notice to maharashtra govt on prof saibabas ill health