जुलै महिन्याच्या सुरूवातील विश्रांती घेतलेल्या पावसाने महिन्याच्या मध्यानंतर मुंबई आणि उपनगर, तसेच राज्यातील अनेक भागांमध्ये जोरदार हजेरी लावली. गेल्या काही दिवसांमध्ये रेकॉर्ड ब्रेक पाऊस झाल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली. 2014 नंतर यावर्षी जुलै महिन्यात सर्वाधिक पावसाची नोंद करण्यात आली. यापूर्वी 1959 साली जुलै महिन्यात सर्वाधिक पावसाची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर 2014 मध्ये जुलै महिन्यात सर्वाधिक पाऊस झाला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यावर्षी जुलै महिन्यात कुलाब्यात सरासरी 1175.1 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तर सांताक्रुझ परिसरात जुलै महिन्यात सरासरी 1464.8 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. 2014 साली सरासरी 1468.5 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली. 1959 नंतर राज्यात 2014 साली राज्यात सर्वाधिक पावसाची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर यावर्षी जास्त पावसाची नोंद झाली, असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याचे उप महासंचालक के.एस.होसाळीकर यांनी ट्विटरवरून दिली.

दरम्यान, आतापर्यंत कोलाबा परिसरात 1516.2 मिलीमीटर, तर सांताक्रुझ परिसरात 1979.9 मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याचे होसाळीकर यांनी नमूद केले आहे. गेल्या काही दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणारी काही धरणेही पूर्णपणे भरली आहेत. तसेच येत्या काळात महाराष्ट्रातील अन्य भागांमध्येही दिलासादायक पर्जन्यमान राहणार असल्याची अपेक्षा हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Highest rainfall in mumbai july 2019 weather departmet jud
First published on: 31-07-2019 at 18:00 IST