मुंबईतील हिंदुजा, सोमय्या, खालसा, एच. आर. महाविद्यालयांना संभाव्य सर्वोत्तम महाविद्यालयाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने गुरुवारी देशातील १२४ महाविद्यालयांची ‘कॉलेज व्युइथ पॉटेन्शिअल एक्सलन्स’ पुरस्कारासाठी निवड जाहीर केली.
विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (यूजीसी) महाविद्यालयांत देण्यात येणारे शिक्षण, पायाभूत सुविधा,, महाविद्यालयांकडून सादर करण्यात आलेले रीसर्च प्रोजेक्ट यावर हा पुरस्कार दिला जातो. यामध्ये यावर्षी चर्चगेट येथील एच आर. कॉलेज, माटुंगा येथील गुरुनानक खालसा महाविद्यालय, माटुंगा येथील नानावटी कॉलेज, मुनीबेन एम.पी.शहा महिला कॉलेज, विद्याविहार येथील के.जे. सोम्मया सायन्स आणि के.जे. सोम्मया आर्टस व कॉमर्स कॉलेज आणि चर्नीरोड येथीला हदुजा कॉलेजाचा या यादीत समावेश आहे. तसेच ठाण्यातील बांदोडकर कॉलेज, पुण्यातील सिब्मांसिस कॉलेज, सांगलीतील कुसुमताई राजारामबापू पाटील कन्या महाविद्यालय, सोलापूरचे वालचंद कॉलेज, भाऊराव पाटील महाविद्यालयांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.