सुमारे १० वर्षांपूर्वी मद्यधुंदावस्थेत गाडी चालवताना पदपथावर झोपलेल्या पाच जणांना चिरडल्याचा आरोप असलेला अभिनेता सलमान खान याला पोलीस पाठिशी घालत असल्याच्या तक्रारीची गंभीर दखल घेत उच्च न्यायालयाने वांद्रे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकासह सलमानला ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे. तसेच २७ डिसेंबर रोजी न्यायालयात ‘न चुकता’ हजर राहण्याचेही फर्मान सोडले आहे. मद्यधुंदावस्थेत गाडी चालवून वांद्रे येथील अमेरिकन बेकरीसमोरील पदपथावर झोपलेल्या पाच जणांना चिरडल्याचा आरोप सलमानवर आहे.