मंबई : मुंबईत नोकरीसाठी येणाऱ्या महिलांच्या निवासासाठी ताडदेव येथे म्हाडाच्या संक्रमण शिबिराच्या जागेवर  एक हजार महिलांसाठी ४५० खोल्यांचे सुसज्ज वसतिगृह उभारले जाणार असल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी  मंगळवारी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यभरातून महिला येथे नोकरी करण्यासाठी येतात, मात्र त्यांना कार्यालयाच्या जवळ राहणे शक्य होत नाही. ही गरज ओळखून ‘म्हाडा’अंतर्गत ताडदेव येथील एम.पी.मिल कम्पाउंड परिसरात महिलांसाठी हे सुसज्ज वसतिगृह उभारणार असल्याचे आव्हाड यांनी यावेळी सांगितले.

मंत्रालय, मुंबई सेंट्रल, महालक्ष्मी, ग्रँट रोड अशा महत्त्वूपर्ण ठिकाणांपासून हे वसतिगृह अगदी जवळ असल्याने मुंबईत नोकरी करणाऱ्या महिलांचा वेळ व प्रवासाचा त्रास वाचणार आहे. ४५० खोल्यांचे हे सुसज्ज वसतिगृह साधारणपणे दीड ते दोन वर्षांत उभारले जाणार असून येत्या सहा महिन्यांत त्याबाबतची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन काम सुरू केले जाणार असल्याचेही आव्हाड यांनी सांगितले. या कामासाठी अंदाजे ३५ कोटी रुपये एवढा खर्च अपेक्षित असून वसतिगृह उभारल्यानंतर त्याच्या देखभाल दुरुस्तीचे काम स्वतंत्र संस्था करेल, जेणेकरून त्याची गुणवत्ता व सोयीसुविधांवर परिणाम होणार नाही, असेही त्यांनी सागितले. नोकरदार महिलांसाठी मुंबईत वसतिगृह उभारावे, अशी सूचना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी के ली होती.

* मंत्रालय, मुंबई सेंट्रल, महालक्ष्मी, अशा महत्त्वूपर्ण ठिकाणांपासून हे वसतिगृह जवळ असल्याने मुंबईत नोकरी करणाऱ्या महिलांचा वेळ व प्रवासाचा त्रास वाचणार आहे. ल्ल ४५० खोल्यांचे हे सुसज्ज वसतिगृह साधारणपणे दीड ते दोन वर्षांत उभारले जाणार आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hostel for working women in mumbai zws
First published on: 14-04-2021 at 02:15 IST