काळ्या पैशाविरोधातील सर्जिकल स्ट्राईकमुळे सामान्यांचे हाल होण्याच्या मुद्द्यावरून नरेंद्र मोदी यांच्यावर जाहीर टीकास्त्र सोडणाऱ्या उद्धव ठाकरे यांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी कौतूक केले आहे. सामान्य जनतेच्या भावना ठामपणे मांडल्याबद्दल मी उद्धव ठाकरे यांना सलाम करतो, असे आव्हाड यांनी ट्विटरवरील संदेशात म्हटले आहे. काळा पैसा आणि बनावट चलनाच्या समस्येला आळा घालण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी ५०० व एक हजार रुपयांच्या नोटा अचानकपणे रद्द केल्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून दैनंदिन व्यवहार करताना सामान्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे विरोधी पक्षांनी भाजपला धारेवर धरले आहे. मित्रपक्ष असूनही भाजपवर सातत्याने कुरघोडी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या शिवसेनेनेही विरोधकांच्या या सुरात सूर मिसळला आहे. अचानकपणे नोटा रद्द करण्यात आल्याने सर्वसामान्य जनतेचे हाल थांबविण्यात आले नाही, तर चिडलेली जनता निवडणुकीत ‘लक्ष्यभेद’ करून धडा शिकवेल आणि सरकारला ते भारी पडेल, असा खणखणीत इशाराच शुक्रवारी उद्धव ठाकरेंनी दिला होता. उद्धव यांच्या या जाहीर टीकेमुळे अगोदरच टोकाचे वितुष्ट निर्माण झालेल्या शिवसेना आणि भाजप युतीमधील तणाव शिगेला पोहचण्याची शक्यता आहे.

जितेंद्र आव्हाडांनी अर्णव गोस्वामींवर दाखल केला १०० कोटींचा मानहानीचा दावा

https://twitter.com/Awhadspeaks/status/797081893271388160

https://twitter.com/Awhadspeaks/status/797140556900159488

https://twitter.com/Awhadspeaks/status/797086186229694465

https://twitter.com/Awhadspeaks/status/797080592416444420

राज्यातील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून सेना-भाजपमधील याच बेदिलीचा फायदा उठविण्याचा प्रयत्न केला जाणे साहजिक आहे. जितेंद्र आव्हाड यांनीदेखील मोदींवरील टीकास्त्रानंतर उद्धव ठाकरे यांचे कौतूक करून असाच प्रयत्न केल्याची चर्चा आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी न घाबरता सामान्य लोकांची भावना व्यक्त केल्याबद्दल त्यांना सलाम करतो. नोटा रद्द करण्याचा निर्णयाचा त्रास कष्टकऱ्यांना जास्त झाला आहे, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.


असे धाडस फक्त आदित्य ठाकरेच दाखवू शकतात – आव्हाडांचा टोला