१५० कोटींचा खर्च ; दोन महिन्यांत कामाला सुरुवात

मुंबई : दादर येथे उभारण्यात येत असलेल्या बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचा विकास आंतरराष्ट्रीय स्तरावर करण्याचा प्रयत्न मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) केला जात आहे. याचाच भाग म्हणून आता स्मारकात ‘इमर्सिव्ह म्युझियम’ साकारले जाणार आहे. महापौर निवासस्थान येथील २.९४ एकर जागेवर बाळासाहेब ठाकरे यांचे राष्ट्रीय स्मारक उभारण्यात येत आहे. दोन टप्प्यांत स्मारकाचे काम करण्यात येत असून पहिल्या टप्प्यात इमारतीचे बांधकाम, स्थापत्य, विद्युत, वातानुकूलित यंत्रणा उभारणी, बाह्य सजावट, वाहनतळ उभारणी यासह अन्य कामे केली जाणार आहेत, तर दुसऱ्या टप्प्यात अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असे संग्रहालय बांधले जाणार आहे. त्यानुसार आता ‘इमर्सिव्ह म्युझियम एक्सपिरियन्स’ स्वरूपात हे संग्रहालय बांधण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती महानगर आयुक्त एस.व्ही.आर. श्रीनिवास यांनी दिली.

Court Grants Pre Arrest Bail, Rashtriya Swayamsevak Sangh, name misusing Case, rss name misusing Case, Pre Arrest Bail, rss, marathi news, nagpur news,
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नावाचा दुरुपयोग, न्यायालय म्हणाले…
Piyush Goyal on Elon Musk Tesla
टेस्लाचा प्रकल्प महाराष्ट्रात की गुजरातमध्ये? पियुष गोयल यांचं ‘मनोज कुमार’ स्टाइल हटके उत्तर
new international cricket stadium in thane marathi news
ठाण्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान? ‘एमसीए’ची एकमेव निविदा दाखल
The Central Wildlife Board proposed a highway through the largest tiger project in the country
देशातील सर्वात मोठय़ा व्याघ्रप्रकल्पातून महामार्ग जाणार

या संग्रहालयाच्या कामासाठी १५० कोटींच्या निधीस मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे आता या कामाला सुरुवात करण्याच्या दृष्टीने संग्रहालयाच्या कामासाठी निविदा मागविण्यात आली आहे. पुढील दोन महिन्यांत संग्रहालयाच्या कामाला सुरुवात करण्यात येणार असून काम सुरू झाल्यापासून सहा महिन्यांत नावीन्यपूर्ण संग्रहालय पूर्ण करण्यात येणार आहे. जानेवारी २०२३ मध्ये हे संग्रहालय सर्वसामान्यांसाठी खुले होण्याची शक्यता आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

या संग्रहालयात बारा विशेष दालने असणार असून बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनप्रवासातील विविध टप्पे मांडले जाणार आहेत. हे संग्रहालय अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असे असणार आहे. त्यामुळे येथे येणाऱ्यांना आपण बाळासाहेब ठाकरे यांच्याशी संवाद साधला असल्याचा, त्यांच्या प्रतिमेला स्पर्श करत असल्याचा अनुभव मिळणार आहे. अत्याधुनिक अशा डिजिटल भिंती, लेझर शो, दृकश्राव्य माध्यम, व्हर्च्युअल रियालिटी अशा तंत्रज्ञानाचा वापर करून हे संग्रहालय उभारण्यात येणार आहे. डिजिटल भिंतीवरील एखाद्या माहितीवर बोट लावल्याबरोबर (क्लिक) केल्याबरोबर त्याबाबतची माहिती दृकश्राव्य रूपात दिली जाईल. लखनऊमध्ये ‘इमर्सिव्ह म्युझियम एक्सपिरियन्स’ संग्रहालय आहे. मात्र या संग्रहालयापेक्षाही वेगळे आणि अधिक प्रगत असे तंत्रज्ञान वापरून हे संग्रहालय उभारण्यात येणार आहे.