मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) ‘ठाणे – भिवंडी – कल्याण मेट्रो ५’ मार्गिकेचे काम युद्धपातळीवर हाती घेतले असून या मार्गिकेसाठी मेट्रो गाड्या खरेदी करण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे. या मार्गिकेसाठी २२ मेट्रो गाड्या खरेदी करण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत. या गाड्यांच्या खरेदीसाठी २ हजार ६४० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एमएमआरडीए सध्या मुंबई महानगर प्रदेशात विविध मेट्रो मार्गिकांची कामे करीत आहेत. येत्या दीड – दोन वर्षांत यापैकी काही मार्गिका वाहतूक सेवेत दाखल करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे. त्यामुळे एमएमआरडीएने मेट्रो मार्गिकांच्या कामाला वेग दिला आहे. त्याचबरोबर मेट्रो गाड्या खरेदी करण्याची तयारी सुरू केली आहे. एमएमआरडीएने ‘स्वामी समर्थ नगर – विक्रोळी मेट्रो ६’ आणि ‘मेट्रो ४’, ‘मेट्रो ४ अ’ (वडाळा – ठाणे – कासारवडवली, कासारवडवली – गायमुख) मार्गिकांसाठी मेट्रो गाड्यांच्या खरेदीची प्रक्रिया सुरू केली आहे. आता ‘मेट्रो ५’ मार्गिकेसाठी २२ गाड्या खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत. कंत्राटदाराची नियुक्ती झाल्यापासून चार वर्षांत ही मार्गिका टप्प्याटप्प्याने सेवेत दाखल होणार आहेत. तर १७ वर्षांसाठी या गाड्यांच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी नियुक्त कंत्राटदारावर सोपविण्यात येणार आहे.

हेही वाचा : धारावी पुनर्विकासात व्यावसायिकांना आता जीएसटी सवलतीचे गाजर…पण पुनर्विकास कोठे होणार याबाबत मौन!

‘ठाणे – भिवंडी – कल्याण मेट्रो ५’ मार्गिका २४.५० किमी लांबीची आहे. तब्बल ८४१६ कोटी रुपये खर्च करून ही मार्गिका उभारण्यात येत असून दोन टप्प्यांत या मार्गिकेचे काम करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात कापूरबावडी – कशेळी – धामणकरनाकी दरम्यान, तर दुसऱ्या टप्प्यात धामणकर नाका – भिवंडी – कल्याण दरम्यान मार्गिकेचे काम करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्याचे काम सध्या वेगात सुरू असून आतापर्यंत या टप्प्याचे ८४ टक्के काम पूर्ण झाले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In mumbai mmrda to purchase 22 metro trains for thane bhiwandi kalyan metro 5 line mumbai print news css
First published on: 27-02-2024 at 13:07 IST