मुंबई पोलिसांनी मागच्या आठवड्यात पॉर्न चित्रपटांच्या रॅकेटचा पदार्फाश केला. या प्रकरणात आता आणखी नवीन माहिती समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत मॉडेल-अभिनेत्रीसह एकूण आठ जणांना अटक केली आहे. यामध्ये प्रोफेशनल फोटोग्राफर आणि परदेशी प्रोडक्शन कंपनीच्या कर्मचाऱ्याचाही समावेश आहे.

करोना व्हायरसमुळे लॉकडाउन करण्यात आला होता. या काळात पॉर्न फिल्मची मागणी मोठया प्रमाणात वाढली होती. ही मागणी पूर्ण करण्यासाठी आरोपी मुंबईजवळचे बंगले भाडयावर घेऊन तिथे पॉर्न चित्रपटाचे शूटिंग करत होते, असे पोलिसांनी सांगितले.

आणखी वाचा- पॉर्न व्हिडीओ बनवणारी ‘गंदी बात’मधील गहना वशिष्ठ आहे तरी कोण?

या प्रकरणात अटकेत असलेली अभिनेत्री-मॉडेल गहना वशिष्ठने प्रोडक्शन कंपनी स्थापन केली होती. शॉर्ट फिल्मसच्या नावाखाली ती पॉर्न क्लिप्सची निर्मिती करत होती, असा आरोप पोलिसांनी केला आहे. पोलिसांनी सोमवारी या प्रकरणात उमेश कामत नावाच्या माणसाला अटक केली. ओटीटी प्लॅटफॉर्मवर पॉर्न क्लिप अपलोड करण्यासंबंधी परदेशी प्रोडक्शन हाऊससोबत समन्वय साधण्यात त्याची महत्त्वाची भूमिका होती असा आरोप पोलिसांनी केला आहे.

आणखी वाचा- ‘गंदी बात’ फेम गहनाच्या पॉर्न चित्रपटात काम करण्यासाठी नवोदीत कलाकारांना मिळायचे इतके पैसे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुंबईमध्ये पॉर्न फिल्मचे चित्रीकरण केल्यानंतर ते परदेशातील सर्व्हरच्या माध्यमातून ओटीटी प्लॅटफॉर्मवर क्लिप अपलोड करायचे, जेणेकरुन ते कोणाच्या नजरेत येणार नाहीत, असे पोलिसांनी सांगितले. “गहना नवोदीत स्ट्रगल करणाऱ्या कलाकारांना हेरायची. या कलाकरांना आमिष दाखवून त्यांच्याकडून आपल्या पॉर्न चित्रपटात काम करुन घ्यायची. या नवोदीत कलाकारांना एका पॉर्न चित्रपटात काम करण्याचे १५ ते २० हजार रुपये मिळायचे” अशी माहिती या प्रकरणाच्या तपास अधिकाऱ्याने दिली. बॉलिवूडचे अन्य लोकही या रॅकेटशी संबंधित आहेत का? त्या अंगाने सुद्धा पोलीस तपास करत आहेत.