प्राप्तिकर विभागामार्फत स्टेनोपदासाठी मुलुंड येथे घेण्यात आलेली परीक्षा मनसेच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी उधळून लावली. परीक्षेसाठी बसलेले सर्व उमेदवार परप्रांतीय असल्याचा आरोप करीत मनसे कार्यकर्त्यांनी परीक्षा रद्द करण्याची मागणी केली होती. ती मान्य करण्यात आली. मुलुंडमधील महापालिकेच्या कार्यालयामध्ये शनिवारी प्राप्तिकर विभागाकडून स्टेनोच्या पदासाठी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी आलेले उमेदवार अमराठी असल्याची माहिती मिळताच मनसेचे विभागाध्यक्ष सत्यवान दळवी आणि मनसे कार्यकर्त्यांनी परीक्षा नियंत्रकांना घेराव घातला. त्यानंतर परीक्षा नियंत्रकांनी ही परीक्षा रद्द केली.
संग्रहित लेख, दिनांक 17th Feb 2013 रोजी प्रकाशित
प्राप्तिकर परीक्षा मनसेने उधळली
प्राप्तिकर विभागामार्फत स्टेनोपदासाठी मुलुंड येथे घेण्यात आलेली परीक्षा मनसेच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी उधळून लावली. परीक्षेसाठी बसलेले सर्व उमेदवार परप्रांतीय असल्याचा आरोप करीत मनसे कार्यकर्त्यांनी परीक्षा रद्द करण्याची मागणी केली होती. ती मान्य करण्यात आली.
First published on: 17-02-2013 at 04:39 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Income tax examination dissipate by mns