scorecardresearch

मुंबईच्या किमान तापमानात वाढ

सांताक्रूझ येथे कमाल तापमान ३२.१ अंश सेल्सिअस आणि कुलाबा येथे ३१.२ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. 

मुंबई : सोमवारी पुन्हा एकदा मुंबईच्या किमान तापमानात वाढ झाली आहे. सरासरीच्या तुलनेत सांताक्रूझ येथील किमान तापमान ३ अंशांनी तर कुलाबा येथील किमान तापमान २ अंशांनी अधिक होते. येथे अनुक्रमे २१.६ अंश सेल्सिअस आणि २२.६ अंश सेल्सिअस नोंद झाली.

सांताक्रूझ येथे कमाल तापमान ३२.१ अंश सेल्सिअस आणि कुलाबा येथे ३१.२ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. 

हवा गुणवत्ता निर्देशांक कुलाबा येथे ३१३, माझगाव येथे ३१७ असा अतिवाईट नोंदवला गेला. भांडुप, मालाड, वांद्रे-कुर्ला संकुल येथील हवेचा दर्जाही किंचित ढासळला होता.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Increase in minimum temperature in mumbai akp

ताज्या बातम्या