रौप्य, कांस्य पदकांची कमाई

मुंबई :  ‘युरोपियअन गर्ल्स मॅथॅमॅटिक्स ऑलिम्पियाड’मध्ये भारतीय विद्यार्थिनींनी रौप्य आणि कांस्य पदके पटकावली आहेत. भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पुण्यातील रोहिणी जोशी हिने रौप्य पदक पटकावले आहे, तर  तेलंगणामधील व्ही. साई किर्तना, दिल्ली येथील अनुष्का अगरवाल हिने कांस्य पदक पटकावले आहे. या संघाला पंजाब विद्यापीठातील निवृत्त प्राध्यापक व्ही. के. ग्रोव्हर, इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिटय़ूटमधील प्राध्यापक शांता लाईश्राम यांनी या संघाचे नेतृत्व केले तर मुंबई विद्यापीठाच्या गणित विभागातील निवृत्त प्राध्यापक मंगला गुर्जर यांनी संघाचा समन्वय साधला. सलग दुसऱ्यावर्षी या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व भारतीय विद्यार्थिनींनी पदके पटकावली आहेत. युक्रेन येथे ही स्पर्धा झाली. या स्पर्धेत पन्नास देशांतील १९६ स्पर्धक सहभागी झाले होते. त्यापैकी १४२ विद्यार्थिनी या युरोपियन देशांतील होत्या.